World Corona Good News: जगातील 16 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात, जर्मनीत 85 %, इराणमध्ये 80% भारतात 33% कोरोनामुक्त!

World Corona Good News: Over 16 lakh patients worldwide overcome corona, 85% in Germany, 80% in Iran, 33% in India corona free

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – कोणतेही खात्रीशीर औषध अथवा उपचारपद्धती उपलब्ध नसतानाही कोरोनाचा संसर्ग झालेले जगातील सुमारे 37 टक्के म्हणजेच 16 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर यशस्वी मात केली आहे. जर्मनीतील 85 टक्के तर इराणमधील 80 टक्के कोरोनारुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणही आता जवळपास 33 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त आहे. 14 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत असून त्यापैकी 2 लाख 96 हजार 746 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 21 टक्के आहे. चीनमध्ये सर्वाधिक म्हणजे 94.3 टक्के कोरोना रुग्ण बरे झालेे आहेत, मात्र चीनच्या आकडेवारीबाबत अनेक देशांनी शंका व्यक्त केली आहे.

जर्मनीत 1 लाख 73 हजार 171 पैकी 1 लाख 47 हजार 200 रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण तब्बल 85 टक्के आहे. इराणमध्ये 1 लाख 10 हजार 767 पैकी 88 हजार 357 रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण 79.8 टक्के आहे.

स्पेनमध्ये 2 लाख 69 हजार 520 पैकी 1 लाख 80 हजार 470 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 67 टक्के आहे. इटलीमध्ये 2 लाख 21 हजार 216 पैकी 1 लाख 9 हजार 39 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 49.3 टक्के आहे. ब्राझीलमध्येही 41.7 टक्के कोरोनारुग्ण बरे झाले आहेत.

भारतात 74 हजार 292 पैकी 24 हजार 420 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. भारतातील कोरोनामुक्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता ते 32.9 टक्के म्हणजे जवळजवळ 33 टक्के झाले आहे. फ्रान्समधील 32.4 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. पाकिस्तानमधील कोरोनामुक्तांचे प्रमाण 25.7 टक्के आहे.

रशियात 2 लाख 32 हजार 243 पैकी 43 हजार 512 म्हणजे केवळ 18.74 टक्केच रुग्ण बरे झाले आहेत. मात्र रशियातील मृत्यूदर 0.9 टक्के आहे. त्यामुळे रशियातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी फारशी चिंतेची परिस्थिती दिसत नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.