World Corona Update: कोरोना संसर्ग अमेरिकेत 30 लाखांवर, ब्राझीलमध्ये 16 लाखांवर तर भारतात 7 लाखांवर

World Corona Update: Corona Outbreak Over 30 lakh in US, Over 16 lakh in Brazil and Over 7 lakh in India जगात 56.58 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर 4.61 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 38.82 टक्के

एमपीसी न्यूज – जगातील एकूण कोरोना संसर्ग एक कोटी 17 लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. त्यातील 30 लाखांहून अधिक कोरोना संसर्ग अमेरिकेत तर 16 लाखांहून अधिक कोरोना संसर्ग ब्राझिलमध्ये झाला आहे. भारतातील कोरोना संसर्ग देखील सात लाखांच्या वर गेला आहे. हा संसर्ग वाढत असतानाच कोरोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूदर तसेच सक्रिय रुग्णांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे, ही आशादायक बाब समजली जाते. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 17 लाख 39 हजार 167 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 40 हजार 660 (4.61 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 66 लाख 41 हजार 864 (56.58 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 45 लाख 56 हजार 643 (38.82 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 44 लाख 98 हजार 664 (98.73 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 57 हजार 979 (1.27 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

30 जून – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 814, कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 375, मृतांची संख्या 5 हजार 062

1 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 96 हजार 901, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 758, मृतांची संख्या 4 हजार 847

2 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 864, कोरोनामुक्त 2 लाख 278 , मृतांची संख्या 5 हजार 155

3 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 09 हजार 028, कोरोनामुक्त 1 लाख 34 हजार 276 , मृतांची संख्या 5 हजार 170

4 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 89 हजार 413, कोरोनामुक्त 1 लाख 41 हजार 408 , मृतांची संख्या 4 हजार 489

5 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 499, कोरोनामुक्त 97 हजार 176 , मृतांची संख्या 3 हजार 572

6 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 71 हजार 508, कोरोनामुक्त 1 लाख 06 हजार 240 , मृतांची संख्या 3 हजार 583

अमेरिकेतील कोरोना संसर्ग 30 लाखांच्या पुढे

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (सोमवारी) 50 हजार 586 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 30 लाख 40 हजार 833 झाली आहे. सोमवारी 378 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली आहे. मृतांचा एकूण आकडा 1 लाख 32 हजार 979 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 13 लाख 24 हजार 947 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 15 लाख 82 हजार 907 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये सोमवारी 656 कोरोना बळी!

ब्राझीलमध्ये सोमवारी 656 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 65 हजार 556 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 16 लाख 26 हजार 071 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 9 लाख 78 हजार 615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 81 हजार 900 झाली आहे.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 30 हजारांच्या पुढे

सोमवारी मेक्सिकोत 273 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. मेक्सिकोतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 56 हजार 848 झाली असून त्यापैकी 1 लाख 55 हजार 604 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 30 हजार 639 कोरोना बळी गेले आहे. त्यामुळे आता मेक्सिकोत 70 हजार 605 सक्रिय रुग्ण उरले आहेत.

भारतात सोमवारी 474 कोरोना मृत्यूंची नोंद

भारतात सोमवारी 474 कोरोना बळींची नोंद झाली आहे. पेरूमध्ये 183, इराणमध्ये 160, कोलंबियात 146, रशियात 135 तर दक्षिण अफ्रिकेत 111 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. इराकमध्ये 94, इजिप्तमध्ये 79, चिलीमध्ये 76, अर्जेंटिना 75, इंडोनेशिया 70, बोलिविया 56, सौदी अरेबिया 52 तर पाकिस्तानात 50 बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 3,040,833 (+50,586), मृत 1,32,979 (+378)
 2. ब्राझील – कोरोनाबाधित 16,26,071 (+21,486), मृत 65,556 (+656)
 3. भारत – कोरोनाबाधित 7,20,346 (+22,510) , मृत 20,174 (+474)
 4. रशिया – कोरोनाबाधित 6,87,862 (+6,611), मृत 10,296 (+135)
 5. पेरू – कोरोनाबाधित 3,05,703 (+2,985), मृत 10,772 (+183)
 6. स्पेन –  कोरोनाबाधित 2,98,869 (+414), मृत 28,388 (+3)
 7. चिली – कोरोनाबाधित 2,98,557 (+3,025), मृत 6,384 (+76)
 8. यू. के. – कोरोनाबाधित 2,85,768 (+352), मृत 44,236 (+16)
 9. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,56,848 (+4,683), मृत 30,639 (+273)
 10. इराण – कोरोनाबाधित 2,43,051 (+2,613), मृत 11,731 (+160)
 11. इटली – कोरोनाबाधित 2,41,819 (+208), मृत 34,869 (+8)
 12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,31,818 (+3,344), मृत 4,762 (+50)
 13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,13,716 (+4,207), मृत 1,968 (+52)
 14. टर्की – कोरोनाबाधित 2,06,844 (+1,086) मृत 5,241 (+16)
 15. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,05,721 (+8,971), मृत 3,310 (+111)
 16. जर्मनी – कोरोनाबाधित 1,98,057 (+499), मृत 9,092 (+6)
 17. फ्रान्स – कोरोनाबाधित 168,335 (+176), मृत 29,920 (+13)
 18. बांगलादेशकोरोनाबाधित 1,65,618 (+3,201), मृत 2,096 (+44)
 19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,20,281 (+3,171), मृत 4,210 (+146)
 20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,05,935 (+399), मृत 8,693 (+9)
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like