World Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांवर तर मृतांचा आकडा अडीच लाखांवर

World Corona Update: Corona patients count rises to 40 lakh, death toll rises to 2.5 lakh

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 40 लाख 12 हजार 770 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 76 हजार 215 (6.88 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 13 लाख 85 हजार 123 (34.52 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 23 लाख 51 हजार 432 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 23 लाख 02 हजार 733 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 48 हजार 699  म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मृतांच्या संख्येतही लक्षणीय वाढ दिसत आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

3 मे – नवे रुग्ण 81 हजार 725  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 480

4 मे – नवे रुग्ण 83 हजार 255  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 096

5 मे – नवे रुग्ण 85 हजार 991  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 258

6 मे – नवे रुग्ण 95 हजार 325  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 811

7 मे – नवे रुग्ण 96 हजार 262  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 589

8 मे – नवे रुग्ण 97 हजार 128  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 550

अमेरिकेत काल (शुक्रवारी) एका दिवसांत 1,687 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा जवळजवळ 78 हजारांच्या पुढे गेला असून तो आता 78 हजार 615 झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 13 लाख 21 हजार 785 वर पोहचला आहे.

ब्राझीलमध्ये काल मृतांचा आकडा वाढून 804 तर इंग्लंडमध्ये 626 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. मेक्सिकोमध्ये कोरोनाचे 257 बळी गेले आहेत. इटली व फ्रान्समध्ये प्रत्येकी 243, स्पेन 229 तर जर्मनी 118 कोरोनाबाधितांचा काल मृत्यू झाला. इटलीने कोरोनाबाधित मृतांचा 30 हजारचा टप्पा ओलांडला आहे.

जागतिक क्रमवारीत आता स्वित्झर्लंड 18 व्या स्थानावर

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत स्वित्झर्लंड व मेक्सिको या दोन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. स्वित्झर्लंड 19 व्या स्थानावरून 18 व्या स्थानावर पोहचला आहे तर मेक्सिकोमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांची संख्या अचानक वाढल्याने 20 व्या स्थानावरून 19 व्या पोहचला आहे. काल 18 व्या स्थानावर असलेला इक्वाडोर आता 20 व्या स्थानावर गेला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 13,21,785 (+29,162), मृत 78,615 (+1,687)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,60,117 (+3,262), मृत 26,299 (+229)
  3. इटली – कोरोनाबाधित 2,17,185 (+1,327), मृत 30,201 (+274)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,11,364 (+4,649), मृत 31,241 (+626)
  5. रशिया – कोरोनाबाधित 1,87,859 (+10,699), मृत 1,723 (+98)
  6. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,76,079 (+1,288), मृत 26,230 (+243)
  7. जर्मनी – कोरोनाबाधित 1,70,588 (+1,158), मृत 7,510 (+118)
  8. ब्राझीलकोरोनाबाधित 1,45,892 (+10,199), मृत 9,992 (+804)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,35,569 (+1,848), मृत 3,689 (+48)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,04,691 (+1,556), मृत 6,541 (+68)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,886 (+1), मृत 4,633 (+0)
  12. कॅनडा –  कोरोनाबाधित 66,434 (+1,512), मृत 4,569 (+161)
  13. पेरू –  कोरोनाबाधित 61,847 (+3,321) , मृत 1,714 (+87) 
  14. भारत – कोरोनाबाधित 59,695 (+3,344) , मृत 1,985 (+96)
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 52,011 (+591), मृत 8,521 (+106)
  16. नेदरलँड – कोरोनाबाधित 42,093 (+319), मृत 5,359 (+71)
  17. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 35,432 (+1,701) मृत 229 (+10) 
  18. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 30,207 (+81), मृत 1,823 (+13)
  19. मेक्सिको – कोरोनाबाधित 29,616 (+1,982), मृत 2,961 (+257)
  20. इक्वाडोर – कोरोनाबाधित 28,818 (+0), मृत 1,704 (+50)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.