World Corona Update: Good News! तब्बल 50 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात!

World Corona Update: Good News! Over 50 lakh patients overcome Corona! एकूण 93 लाखांपैकी 38 लाख सक्रिय कोरोना रुग्ण, मृतांची संख्या 4 लाख 80 हजारांच्या घरात

एमपीसी न्यूज – जगात काल (सोमवारी) एका दिवसात 1 लाख 62 हजार 994 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 1 लाख 19 हजार 809 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. जगातील  कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 93 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 50 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून जवळजवळ 54 टक्के झाली आहे. जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.13 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 41 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासादायक बाब आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 93 लाख 54 हजार 326 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 79 हजार 816 (5.13 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 50 लाख 41 हजार 813 (53.90 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 38 लाख 32 हजार 697 (40.97 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 37 लाख 74 हजार 786 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 57 हजार 911 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

17 जून – नवे रुग्ण 1 लाख 41 हजार 872 ,  कोरोनामुक्त 1 लाख 08 हजार 580, मृतांची संख्या 5 हजार 264

18 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 528 ,  कोरोनामुक्त 96 हजार 845 , मृतांची संख्या 5 हजार 123

19 जून – नवे रुग्ण 1 लाख 81 हजार 005 ,  कोरोनामुक्त 1 लाख 10 हजार 910 , मृतांची संख्या 5 हजार 066

20 जून – नवे रुग्ण 1 लाख 56 हजार 923 ,  कोरोनामुक्त 1 लाख 12 हजार 990 , मृतांची संख्या 4 हजार 428

21 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 254 ,  कोरोनामुक्त 1 लाख 685 , मृतांची संख्या 3 हजार 338

22 जून – नवे रुग्ण 1 लाख 38 हजार 975 , कोरोनामुक्त 82 हजार 775 , मृतांची संख्या 3 हजार 880

23 जून – नवे रुग्ण 1 लाख 62 हजार 994 , कोरोनामुक्त 1 लाख 19 हजार 809 , मृतांची संख्या 5 हजार 465

अमेरिकेत 24 लाखांपेक्षा अधिक कोरोना संसर्ग

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (मंगळवारी) 36 हजार 015 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 24 लाख 24 हजार 168 झाली आहे. मंगळवारी 863 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 23 हजार 473 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 लाख 20 हजार 381 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 12 लाख 80 हजार 314 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये मंगळवारी 1364 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये मंगळवारी 1,364 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 52 हजार 771 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 11 लाख 51 हजार 479 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 6 लाख 13 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 85 हजार 363 आहे.

मेक्सिकोत 759 तर भारतात 468 कोरोना बळी

मेक्सिकोत मंगळवारी एका दिवसात 759 तर भारतात 468 कोरोना बळींची नोंद झाली आहे.  इंग्लंडमध्ये मंगळवारी 280 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. पेरूमध्ये 181, रशियात 153, इराणमध्ये 121, दक्षिण अफ्रिकेत 111, पाकिस्तानमध्ये 105, कोलंबियात 94, इजिप्तमध्ये 87, इराकमध्ये 84, फ्रान्समध्ये 57, इक्वाडोरमध्ये 51 बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 24,24,168 (+36,015), मृत 1,23,473 (+863)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 11,51,479 (+40,131), मृत 52,771 (+1,364)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5.99,705 (+7,425), मृत 8,359 (+153)
  4. भारत – कोरोनाबाधित 4,56,115 (+15,665) , मृत 14,483 (+468)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 3,06,210 (+921), मृत 42,927 (+280)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,93,832 (+248), मृत 28,325 (+1)
  7. पेरू –  कोरोनाबाधित 2,60,810 (+3,363) , मृत 8,404 (+181)
  8. चिली – कोरोनाबाधित 2,50,767 (+3,804), मृत 4,505 (+3)
  9. इटली – कोरोनाबाधित 2,38,833 (+113), मृत 34,675 (+18)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,09,970 (+2,445), मृत 9,863 (+121)
  11. जर्मनी – कोरोनाबाधित 1,92,778 (+659), मृत 8,986 (+17)
  12. टर्की – कोरोनाबाधित 1,90,165 (+1,268), मृत 5,001 (+27)
  13. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,85,122 (+4,577), मृत 22,584 (+759)
  14. पाकिस्तान – कोरोनाबाधित 185,034 (+3,946), मृत 3,695 (+105)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,64,144 (+3,139) मृत 1,346 (+39)
  16. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,61,267 (+517), मृत 29,720 (+57)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,19,198 (+3,412), मृत 1,545 (+43)
  18. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,06,108 (+4,518), मृत 2,102 (+111)
  19. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,01,963 (+326), मृत 8,454 (+18)
  20. कतार – कोरोनाबाधित 89,579 (+1,176), मृत 99 (+0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.