World Corona Update: जागतिक क्रमवारीत भारत 12 व्या स्थानावर, पाकिस्तानचा Top-20 मध्ये समावेश

World Corona Update: India ranked 12th in the world, Pakistan in the top-20

एमपीसी न्यूज – गेल्या आठ दिवसांत भारतातील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत भारत 14 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 40 टक्के रुग्णांची नोंद हे गेल्या आठ दिवसांत झाली आहे. भारतात सध्या दररोज सरासरी साडेतीन हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. पाकिस्तानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जागातील Top 20 देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला आहे. जागतिक क्रमवारीत पाकिस्तान 19 व्या स्थानावर पोहचला आहे. 

इटलीला मागे टाकत इग्लंडने तिसरे तर रशियाने चौथ्या स्थान मिळविले आहे. कित्येक दिवस तिसऱ्या स्थानावर असलेला इटली आता पाचव्या स्थानावर गेला आहे. कॅनडा व पेरूला मागे टाकत भारत 14 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर पोहचला आहे तर कॅनडा 13 व्या आणि पेरू 14 व्या स्थानावर आहेत.  इक्वाडोर Top 20 मधून बाहेर गेला असून पाकिस्तानने इक्वाडोरची जागा घेत 19 वे स्थान मिळविले आहे.

भारतात आतापर्यंत 70 हजार 768 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांत भारतात तब्बल 28 हजार 263 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण सुमारे 40 टक्के आहे. 4 मे रोजी भारतात 3,932 नवीन कोरोना आढळले. 10 मे रोजी भारतात 4,353 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. हा भारतातील एका दिवसातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. गेल्या आठ दिवसांत दररोज सरासरी 3,533 रुग्णांची भर पडत गेल्याने भारताचे जागतिक क्रमवारीतील स्थान वर गेल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील 1.67 टक्के कोरोनाबाधितांची नोंद भारतात झाली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी भारतातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोरोनाचा मृत्यूदर देखील जागतिक मृत्यूदराच्या निम्म्याहून कमी असून तो आणखी किंचित कमी करण्यात भारताला यश आले आहे. भारतात आतापर्यंत एकूण 22 हजार 549 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण आता 31.86 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. भारतातील कोरोना मृतांचा आकडा 2 हजार 294 पर्यंत वाढला आहे. हे प्रमाण 3.24 टक्के आहे.

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 941 पर्यंत वाढली आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 667 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 8,555 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. प्रामुख्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रमुख 20 देशांमध्ये आता पाकिस्तानचाही समावेश झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 1,385,834 (+18,196), मृत 81,795 (+1,008)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 268,143 (+3,480), मृत 26,744 (+123)
  3. यू. के. – कोरोनाबाधित 223,060 (+3,877), मृत 32,065 (+210)
  4. रशिया – कोरोनाबाधित 221,344 (+11,656), मृत 2,009 (+94)
  5. इटली – कोरोनाबाधित 219,814 (+744), मृत 30,739 (+179)
  6. फ्रान्स – कोरोनाबाधित 177,423 (+453), मृत 26,643 (+263)
  7. जर्मनी – कोरोनाबाधित 172,576 (+697), मृत 7,661 (+92)
  8. ब्राझीलकोरोनाबाधित 169,143 (+6,444), मृत 11,625 (+502)
  9. टर्की – कोरोनाबाधित 139,771 (+1,114), मृत 3,841 (+55)
  10. इराण – कोरोनाबाधित 109,286 (+1,683), मृत 6,685 (+45)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,918 (+17), मृत 4,633 (+0)
  12. भारत – कोरोनाबाधित 70,768 (+3,607) , मृत 2,294 (+82)
  13. कॅनडा –  कोरोनाबाधित 69,981 (+1,133), मृत 4,993 (+123)
  14. पेरू –  कोरोनाबाधित 68,822 (+1,515) , मृत 1,961 (+72) 
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 53,449 (+368), मृत 8,707 (+51)
  16. नेदरलँड – कोरोनाबाधित 42,788 (+161), मृत 5,456 (+16)
  17. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 41,014 (+1,966) मृत 255 (+9) 
  18. मेक्सिको – कोरोनाबाधित 35,022 (+1,562), मृत 3,465 (+112)
  19. पाकिस्तान – कोरोनाबाधित 30,941 (+607), मृत 667 (+8)
  20. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 30,344 (+39), मृत 1,845 (+12)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.