World Corona Update: दिवसातील कोरोनाबळींची संख्या सहा दिवसांत निम्म्यावर, 36 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

World Corona Update: Number of daily corona deaths reduced by 50% in the last six days, 36% of patients overcome corona

एमपीसी न्यूज – जगातील कोरोना बळींचा आकडा हा सर्वांच्या काळजात धडकी भरविणारा आहे, मात्र हाच आकडा गेले सहा दिवस टप्प्याने टप्प्याने कमी होत निम्म्यापर्यंत आला आहे. सहा मे रोजी 6 हजार 811 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. ही संख्या 11 मे रोजी 3 हजार 403 इतकी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आणखी एक चांगली घडामोड घडली आहे. जगातील तब्बल 15 लाख 34 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांचे हे प्रमाण 36 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 42 लाख 70 हजार 751 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 87 हजार 540 (6.73 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 15 लाख 34 हजार 371 (35.93 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 24 लाख 48 हजार 918 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 24 लाख 02 हजार 016 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 46 हजार 902 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून येत आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

6 मे – नवे रुग्ण 95 हजार 325  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 811
7 मे – नवे रुग्ण 96 हजार 262  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 589
8 मे – नवे रुग्ण 97 हजार 128  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 550
9 मे – नवे रुग्ण 88 हजार 997  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 248
10 मे – नवे रुग्ण 79 हजार 825 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 510
11 मे – नवे रुग्ण 74 हजार 228  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 403

अमेरिकेत कोरोनाबळींचा आकडा 82 हजारांच्या उंबरठ्यावर

जगातील कोरोनाबाधितांच्या व कोरोना बळींच्या संख्येत काल (सोमवारी) लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत सोमवारी 1,008 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींच्या आकड्याने जवळजवळ 82 हजारांचा टप्पा गाठला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 81,795 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 13 लाख 85 हजार 834 पर्यंत पोहचली आहे.

ब्राझीलमध्ये काल (सोमवारी) 502, फ्रान्समध्ये 263 तर इंग्लंडमध्ये 210 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. इटलीत काल 179, स्पेन व कॅनडात प्रत्येकी 123, मेक्सिकोमध्ये 112, रशियात 94, जर्मनीत 92, भारतात 82 तर पेरूमध्ये 72 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. इंग्लंडने कोरोनाबळींचा 32 हजारांचा टप्पा ओलांडला असून इटलीला मागे टाकत आता इंग्लंडने अमेरिकेच्या खालोखाल दुसरा क्रमांक मिळवला आहे. रशिया देखील हळूहळू दोन हजार मृत्यूंचा टप्पा ओलांडला आहे.

सौदी अरेबियाने कोरोना रुग्णांच्या संख्येचा 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. मेक्सिकोने 35 हजारांचा तर पाकिस्तान व चिलीने 30 हजारांचा टप्पा गाठला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.