World Corona Update: कोरोनाबाधित 71 लाख रुग्णांपैकी 35 लाख कोरोनामुक्त, उरले 32 लाख सक्रिय रुग्ण

World Corona Update: Out of 71 lakh patients with corona, 35 lakh are corona free, the remaining 32 lakh active patients कोरोना बळींची संख्या 4 लाखांपेक्षा अधिक

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने काल (रविवारी) 70 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातील सुमारे 35 लाख रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आता जगातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 32 लाखांपर्यंत खाली आली आहे. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.73 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्याचे प्रमाण 48.83 टक्क्यांपर्यंत वाढले आहे तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 45.44 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोना बळींची संख्या काल (रविवारी) तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 70 लाख 86 हजार 008 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 06 हजार 107 (5.73 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 लाख 59 हजार 972 (48.83 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 32 लाख 19 हजार 929 (45.44 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 31 लाख 66 हजार 177 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 752 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767,  मृतांची संख्या 3 हजार 191

1 जून – नवे रुग्ण 1 लाख 03 हजार 050, मृतांची संख्या 3 हजार 017

2 जून – नवे रुग्ण 1 लाख 15 हजार 215, कोरोनामुक्त 1 लाख 07 हजार 201, मृतांची संख्या 4 हजार 669 

3 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 413,  कोरोनामुक्त 1 लाख 53 हजार 699, मृतांची संख्या 4 हजार 929

4 जून – नवे रुग्ण 1 लाख 29 हजार 990,  कोरोनामुक्त 80 हजार 831, मृतांची संख्या 5 हजार 499

5 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 529,  कोरोनामुक्त 89 हजार 947, मृतांची संख्या 4 हजार 906

6 जून – नवे रुग्ण 1 लाख 26 हजार 715,  कोरोनामुक्त 75 हजार 764, मृतांची संख्या 4 हजार 177

7 जून – नवे रुग्ण 1 लाख 13 हजार 090,  कोरोनामुक्त 48 हजार 619, मृतांची संख्या 3 हजार 382

भारतात एका दिवसांत सर्वाधिक 10,864 नवे रुग्ण तर बळींची संख्या सात हजारांवर

वाढत्या कोरोना संसर्गामुळे भारताने इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत नुकतेच सहावे स्थान मिळविले आहे. भारतातील महाराष्ट्र राज्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत काल चीनलाही मागे टाकले आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 57 हजार 486 झाली आहे. काल (रविवारी) 10 हजार 864 नव्या रुग्णांची भर पडली. एका दिवसात नोंद झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. गेल्या काही दिवसांत दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे.

भारतात मृत्यूदर 2.80 टक्के, जागतिक दरापेक्षा निम्म्याहून कमी

भारतात काल (रविवारी) 261 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित बळींचा आकडा 7,207 पर्यंत पोहचला आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा वाढला असला तरी भारताने मृत्यूदर 2.80 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश मिळविले आहे. जागतिक मृत्यूदर 5.73 टक्के टक्के आहे. म्हणजेच भारतातील मृत्यूदर जागतिक मृत्यूदराच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. 

भारतात सक्रिय रुग्णांचे प्रमाण 49 टक्के

आतापर्यंत 1 लाख 23 हजार 848 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 48.10 टक्के झाले आहे. भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 26 हजार 431 झाली आहे. हे प्रमाण 49.10 टक्के झाले आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढणे आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण घटणे या दोन्ही गोष्टी भारताच्या दृष्टीने आशादायक आहेत.

अमेरिकेने ओलांडला कोरोनाबाधितांचा 20 लाखांचा टप्पा

अमेरिकेत काल (रविवारी) 373 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 12 हजार 469 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 20 लाख 07 हजार 449 झाली आहे तर 7 लाख 61 हजार 708 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 542 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये रविवारी 542 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 36 हजार 499 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6 लाख 91 हजार 962 झाली आहे तर 3 लाख 02 हजार 084 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. ब्राझिलमधील दिवसातील मृतांचा आकडा काल निम्म्याने कमी आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

मेक्सिकोत एका दिवसात 816 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मेक्सिकोत रविवारी एका दिवसात 341 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मेक्सिकोत कोरोनाबाधित मृतांची संख्या आता 13 हजार 511 झाली आहे.  मेक्सिकोत 1 लाख 13 हजार 619 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 81 हजार 544 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असले तरी गेल्या काही दिवसांत मृतांच्या आकड्यात लक्षणीय वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तथापि,  दिवसातील मृतांचा आकडा काल निम्म्याने कमी आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

रविवारी चिलीत जगातील सर्वाधिक बळी

चिलीमध्ये रविवारी 649 कोरोना बळींची नोंद झाली. काल दिवसभरातील ही जगातील सर्वाधिक संख्या आहे. भारतात रविवारी 261, पेरूमध्ये 164 तर रशियात 134 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. इंग्लंडमध्ये 77, इराणमध्ये 72, पाकिस्तानमध्ये 67, कोलंबियात 54, इटलीत 53 तर इंडोनेशियात 50 मृतांची नोंद झाली आहे.

पाकिस्तान 16 व्या स्थानावर, सौदी अरेबियाने ओलांडला रुग्णसंख्येचा एक लाखांचा टप्पा

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तानने कॅनडाला मागे टाकत 16 वे स्थान मिळविले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 98 हजार 943 पर्यंत पोहचली आहे. तर कोरोना बळींच्या आकड्याने दोन हजारचा टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 2002 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.  दरम्यान, सौदी अरेबियाने काल (रविवारी) कोरोनाबाधित रुग्णांचा एक लाखांचा टप्पा ओलांडला. एक लाखापेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांची संख्या आता 15 झाली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे., 

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 20,07,449 (+18,905), मृत 1,12,469 (+373)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 6,91,962 (+18,375), मृत 36,499 (+542)
  3. रशिया – कोरोनाबाधित 4,67,673 (+8,984), मृत 5,859 (+134)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,88,630 (+240), मृत 27,136 (+1)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,86,194(+1,326), मृत 40,542 (+77)
  6. भारत – कोरोनाबाधित 2,57,486 (+10,864) , मृत 7,207 (+261)
  7. इटली – कोरोनाबाधित 2,34,998 (+197), मृत 33,899 (+53)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 1,96,515 (+4,757) , मृत 5,465 (+164)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 1,85,869 (+173), मृत 8,776 (+7)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,71,789 (+2,364), मृत 8,281 (+72)
  11. टर्की – कोरोनाबाधित 1,70,132 (+914), मृत 4,692 (+23)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,53,977 (+343), मृत 29,155 (+13)
  13. चिली – कोरोनाबाधित 1,34,150 (+6,405), मृत 2,190 (+649)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,13,619 (+3,593), मृत 13,511 (+341)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,01,914 (+3,045) मृत 712 (+36)
  16. पाकिस्तान – कोरोनाबाधित 98,943 (+4,960), मृत 2,002 (+67)
  17. कॅनडा –  कोरोनाबाधित 95,699 (+642), मृत 7,800 (+27)
  18. चीन – कोरोनाबाधित 83,036 (+6), मृत 4,634 (0)
  19. कतार – कोरोनाबाधित 68,790 (+1,595), मृत 54 (+3)
  20. बांगलादेशकोरोनाबाधित 65,769 (+2,743), मृत 888 (+42)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.