World Corona Update: दिलासादायक! रविवारी नवे कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत लक्षणीय घट

World Corona Update: Significant drop in new Corona patients and deaths on Sunday

एमपीसी न्यूज – जगभरात काल (रविवारी) नवीन कोरोनाबाधितांची, त्याच बरोबर कोरोना मृत्यूंची संख्या खाली आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. त्यातच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या व टक्केवारी थोडी वाढली आहे. परिणामी जगातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या टक्केवारीत घट सुरूच असल्याचे सकारात्मक संकेत मिळत आहे. कोरोनाच्या जागतिक मृत्यूदरातही घट होत आहे. कोरोनाची रविवारची आकडेवारी ही जगाला बऱ्यापैकी दिलासा देणारी आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 48 लाख 04 हजार 011 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 16 हजार 703 (6.59 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18 लाख 58 हजार 754 (38.69 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 26 लाख 28 हजार 554 (54.71 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 25 लाख 83 हजार 734 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 44 हजार 820 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

12 मे – नवे रुग्ण 85 हजार 315  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 320

13 मे – नवे रुग्ण 88 हजार 220  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 314

14 मे – नवे रुग्ण 96 हजार 334  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 317

15 मे – नवे रुग्ण 99 हजार 405  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 072

16 मे – नवे रुग्ण 95 हजार 518 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 360

17 मे – नवे रुग्ण 82 हजार 257 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 618

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 91 हजारांच्या उंबरठ्यावर

अमेरिकेत रविवारी 865 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 90 हजार 978 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 15 लाख 27 हजार 664 झाली आहे तर 3 लाख 46 हजार 389 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये काल (रविवारी) 485, फ्रान्स 483 तर मेक्सिकोमध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये 170, भारतात 154, इटली 145, पेरू 125, कॅनडा 103, रशियात 94स्पेनमध्ये 87 तर जर्मनीत 22 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत रशिया आता दुसऱ्या स्थानावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत रशियाने स्पेनला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले आहे. गेल्या कित्येक दिवसांत रशियात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दररोज सातत्याने नऊ ते दहा हजारांची भर पडत आहे. त्यामुळे आता रशियात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लख 81 हजार 752 झाली आहे, मात्र रशियाने कोरोना मृत्यूदर कमी ठेवण्यात चांगले यश मिळविले आहे. जागतिक क्रमवारीत रशिया दुसऱ्या स्थानावर असला तरी आतापर्यंत या देशात 2 हजार 631 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 1,527,664 (+19,891), मृत 90,978 (+865)
  2. रशिया – कोरोनाबाधित 281,752 (+9,709), मृत 2,631 (+94)
  3. स्पेन – कोरोनाबाधित 2,77,719 (+1,214), मृत 27,650 (+87)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,43,695 (+3,534), मृत 34,636 (+170)
  5. ब्राझील – कोरोनाबाधित 2,41,080 (7,938), मृत 16,118 (+485)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,25,435 (+675), मृत 31,908 (+145)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,79,569 (204), मृत 28,108 (+483)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,76,651 (+407), मृत 8,049 (+22)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,49,435 (+1,368), मृत 4,140 (+44)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,20,198 (+1,806), मृत 6,988 (+51)
  11. भारत – कोरोनाबाधित 95,698 (+5,050) , मृत 3,025 (+154)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 92,273 (+3,732) , मृत 2,648 (+125)
  13. चीन – कोरोनाबाधित 82,947 (+6), मृत 4,634 (+1)
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 77,002 (+1,138), मृत 5,782 (+103)
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 55,280 (+291), मृत 9,052 (+47)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 54,752 (+2,736) मृत 312 (+10) 
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 47,144 (+2,112), मृत 5,045 (+278)
  18. नेदरलँड – कोरोनाबाधित 43,995 (+125), मृत 5,680 (+10)
  19. चिली – कोरोनाबाधित 43,781 (+2,353), मृत 450 (+29)
  20. पाकिस्तान – कोरोनाबाधित 40,151 (+1,352), मृत 873 (+39)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.