Corona Virus World Update: कोरोनाबाधितांची संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर तर कोरोनामुक्तांची संख्याही 20 लाखांच्या घरात

World Corona Update: The number of corona infected is on the threshold of 50 lakhs, while the number of corona free is also in the house of 20 lakhs

एमपीसी न्यूज – चीनच्या वुहान शहरात डिसेंबर महिन्यात प्रथम आढळलेला कोविड 19 हा कोरोना विषाणू गेल्या साडेचार महिन्यांत जगभरातील जवळपास 50 लाख लोकापर्यंत पोहचला असून 19 लाख 56 हजारपेक्षा अधिक जणांनी कोरोनाचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला आहे तर सव्वातीन लाख कोरोनाबाधितांनी या लढाईत प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता जगभरातील सक्रिय रुग्णांची संख्या कोरोनाचे सुमारे 27 लाख झाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण 39.28 टक्क्यांपर्यंत वाढले आहे तर कोरोना मृतांचे प्रमाण 6.51 टक्क्यापर्यंत खाली आले आहे. त्याचा परिणाम म्हणून सक्रिय रुग्णांची टक्केवारी देखील 54.2 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दरम्यान, सात दिवस कमी झालेला कोरोना संसर्गाचा वेग आणि कोरोना बळींचा संख्या मात्र मंगळवारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 49 लाख 85 हजार 825 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 24 हजार 889 (6.51 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19 लाख 58 हजार 441 (39.28 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 27 लाख 02 हजार 495 (54.20 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 26 लाख 57 हजार 069 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 45 हजार 426 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

13 मे – नवे रुग्ण 88 हजार 220  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 314

15 मे – नवे रुग्ण 99 हजार 405  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 072

16 मे – नवे रुग्ण 95 हजार 518 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 360

17 मे – नवे रुग्ण 82 हजार 257 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 618

18 मे – नवे रुग्ण 88 हजार 858 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 445

19 मे – नवे रुग्ण 94 हजार 813 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 589

ब्राझीलमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक

अमेरिकेबरोबरच ब्राझीलमध्ये मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ब्राझीलमध्ये काल प्रथमच एक हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये मे महिन्यात कोरोना संसर्ग व बळी एकदम वाढल्याचे दिसून येत आहे. 30 एप्रिलला 5,901 असणारी  कोरोनाबाधित मृतांची संख्या 19 मे अखेर 17 हजार 982 वर जाऊन धडकली आहे. जागतिक क्रमवारीत चौथे स्थान गाठणाऱ्या ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 2,71,885 पर्यंत पोहचली आहे. मंगळवारी एका दिवसात ब्राझीलमध्ये 1,130 कोरोना मृत्यू झाले. ब्राझीलमधील आतापर्यंतची ही सर्वाधिक जीवितहानी आहे.

अमेरिकेत मंगळवारी 1,552 कोरोना बळी

अमेरिकेत मंगळवारी 1,552 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 93,533 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 15 लाख 70 हजार 583 झाली आहे तर 3 लाख 61 हजार 180 जण कोरोनामुक्त झाले आहेत. इंग्लंडमध्ये काल (मंगळवारी) 545, इटलीमध्ये 162, मेक्सिकोमध्ये 155 तर भारतात 146 कोरोना बळींची नोंद झाली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 15,70,583 (+20,289), मृत 93,533 (+1,552)
  2. रशिया – कोरोनाबाधित 2,99,941 (+9,263), मृत 2,837 (+115)
  3. स्पेन – कोरोनाबाधित 2.78,803 (+615), मृत 27,778 (+69)
  4. ब्राझील – कोरोनाबाधित 2,71,885 (+16,517), मृत 17,983 (+1,130)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,48,818 (+2,412), मृत 35,341 (+545)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,26,699 (+813), मृत 32,169 (+162)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,80,809 (+882), मृत 28,022 (+NA)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,77,827 (+538), मृत 8,193 (+70)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,51,615 (+1,022), मृत 4,199 (+28)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,24,603 (+2,111), मृत 7,119 (+62)
  11. भारत – कोरोनाबाधित 1,06,475 (+6,147) , मृत 3,302 (+146)
  12. पेरू – कोरोनाबाधित 99,483 (+4,550) , मृत 2,914 (+125)
  13. चीन – कोरोनाबाधित 82,960 (+6), मृत 4,634 (+0)
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 79,112 (+ 1,040), मृत 5,912  (+70)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 59,854 (+2,509) मृत 329 (+9) 
  16. बेल्जियम – कोरोनाबाधित 55,791 (+232), मृत 9,108 (+28)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 51,633 (+2,414), मृत 5,332 (+155)
  18. चिली – कोरोनाबाधित 49,579 (+3,520), मृत 509 (+31)
  19. नेदरलँड – कोरोनाबाधित 44,249 (+108), मृत 5,715 (+21)
  20. पाकिस्तान – कोरोनाबाधित 43,966 (+1,841), मृत 939 (+36)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.