World Update: कोरोनाबाधितांची संख्या 9 लाख 35 हजार 581, मृतांचा आकडा 47 हजार 206!

अमेरिकेतच दोन लाखपेक्षा अधिक रुग्ण, चीनमध्ये आता उरले फक्त 2,004 रुग्ण!

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने नऊ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (गुरुवार) सकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ लाख 35 हजार 581 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 47 हजार 260 पर्यंत वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 94 हजार 115 इतकी आहे. त्यामुळे अजून जगभरात 6 लाख 94 हजार 115 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 35 हजार 478 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

अमेरिकेने कोरोनाबाधितांचा दोन लाखांचा आकडा ओलांडला आहे.  एकूण 2 लाख 15 हजार 081 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 5,109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीत 1 लाख 10 हजार 574 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 13 हजार 155 पर्यंत वाढला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 4 हजार 118 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 9 हजार 387 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्या चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 554 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3,312 जणांचा मृत्यू झाला. 76 हजार 238 रुग्ण बरे झाले असून आता सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 2,004 पर्यंत कमी करण्यात चीनला यश आले आहे.

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

जर्मनी – 77,981 (931)

फ्रान्स – 56,989 (4,032)

इराण – 47,593 (3,036)

यूके – 29,474 (2,352)

स्वित्झर्लंड – 17,768 (488)

टर्की – 15,679 (277)

बेल्जियम – 13,964 (828)

नेदरलँड – 13,614 (1,173)

ऑस्ट्रीया – 10,711 (146)

दक्षिण कोरिया – 9,976 (169)

कॅनडा – 9,731 (114)

पोर्तुगाल 8,251 (187)

ब्राझील 6,931 (244)

इस्राईल 6,092 (26)

ऑस्ट्रेलिया 5,105 (23)

स्वीडन 4,947 (239)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.