World Cup 2011: खळबळजनक ! 2011 साली भारताने जिंकलेली फायनल फिक्स होती, श्रीलंकेच्या माजी क्रीडा मंत्र्यांचा दावा

World Cup 2011: India won world cup final 2011 was fix, claimed the former Sri Lankan sports minister हेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षानंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

एमपीसी न्यूज – भारत आणि श्रीलंका यांच्यात 2011 साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता, असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला. ते श्रीलंकेतील न्यूज फर्स्ट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

2011 साली मुंबईतील वानखेडे मैदानात श्रीलंका आणि भारत यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षानंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. मात्र हा सामना फिक्स होता असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला आहे.

काय आहे श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांचा दावा?
2011 विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे.

पण देशासाठी मी यामध्ये कोणाचेही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

कुमार संगकारा आणि महिला जयवर्धनेकडून ‘खंडन’

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपट्टू आणि 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या महेला जयवर्धनेने या आरोपांची खिल्ली उडवत खोचक ट्विट केले आहे. त्यानंतर श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराने सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे.

क्रीडा मंत्र्यांच्या आरोपाला उत्तर देताना महिला जयवर्धनेने असे ट्विट केले की, निवडणुका जवळ आल्या आहेत का?? सर्कस सुरु झाल्यासारखं वाटतंय…नावं आणि पुरावे कुठे आहेत??. असा सवाल त्याने विचारला होता.

कुमार संगकाराने सुद्धा याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सामना फिक्स असल्याचा दावा केल्यानंतर तो खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्यांची गरज भासेल. सुरक्षा यंत्रणा, लाचलुचपच प्रतिबंधक विभाग आणि ICC हे सारे पुरावा दिल्यानंतरच याबाबत नीट चौकशी व तपास करू शकतात’, असे संगकाराने ट्विट करत सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.