World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारताचा अंतिम संघ जाहीर; रविचंद्रन अश्विनला संधी

एमपीसी न्यूज – भारतामध्ये होणा-या एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) या स्पर्धेसाठी भारताने आपला 15 खेळाडूंचा समावेश असलेला अंतिम संघ जाहीर केला असून या संघामध्ये भारताकडून एक बदल करण्यात आला आहे. डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा जायबंदी झाल्याने त्याच्या ऐवजी संघात भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे.

Pune : पुण्यात गणेशोत्सवात आगीच्या 27 घटना, सुदैवाने जीवित हानी नाही

येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये भारतात विश्वचषक खेळवला जाणार आहे. यासाठी भारताने आपला संघ यापूर्वीच जाहीर केला होता. या संघामध्ये बदल करण्यासाठी 28 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. भारतीय संघातला डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला दुखापत झाल्याने तो या स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या जागी आर अश्विनला संधी देण्यात आली आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा अष्टपैलू असावा असे मत भारतीय क्रिकेट संघ निवड समिती व प्रशिक्षकाचे होते. त्यानुसार रविचंद्रन अश्विन हा गोलंदाजीसह उत्तम फलंदाजी देखील करू शकतो. त्यामुळे त्याची या संघामध्ये वर्णी लागली आहे.

नव्याने जाहीर करण्यात आलेला भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), विराट कोहली, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, शुभमन गिल, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, आणि कुलदीप यादव अशा 15 जणांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.