World Cup 2023 : 7 वर्षानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात

आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना

एमपीसी न्यूज – भारतामध्ये होऊ घातलेल्या विश्वचषक 2024 स्पर्धेच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या (World Cup 2023) संघाचे 27 सप्टेंबरला हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी भारताच्यावतीने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.
 सन 2008 मध्ये भारतातील मुंबई येथील ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये क्रिकेटची दुहेरी मालिका खेळवल्या जात नाहीत.  त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी टूर्नामेंट, विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप अशा स्पर्धांच्या अनुषंगाने एकत्र खेळताना दिसतो.
यापूर्वी पाकिस्तानचा संघ 2017 मध्ये भारतात आला होता. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी हा संघ पुन्हा भारतात आला आहे.विश्वचषक 2024 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 29 तारखेपासून सराव सामन्यांना सुरुवात होत असून पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज सराव सामना खेळवला जाणार आहे.   तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सराव सामना 30 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.  3 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड सराव सामना होणार आहे.
 प्रत्यक्षात 5 ऑक्टोबर पासून विश्वचषकाला सुरुवात होणार असून पहिला सामना गत विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबाद येथे रंगणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा पहिला सामना चेन्नई येथे होणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दिल्ली येथे खेळवला जाणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान (World Cup 2023) यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे सामना रंगणार आहे.
9 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश पुणे येथे एकमेकांशी भिडणार असून, 22 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे . 29 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड सामना लखनऊ येथे होणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका अशी टक्कर मुंबईत होईल. 5 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सामना कोलकत्ता येथे रंगणार आहे. भारताचा साखळी सामन्यातील शेवटचा सामना नेदरलँड विरुद्ध खेळवला जाईल. हा सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगलोर येथे होणार आहे.
 विश्वचषकातला पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कलकत्ता येथे होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगणार आहे.
या विश्वचषकामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासह भारताला दावेदार मानण्यात येत आहे. तर भारताने नुकतेच झालेले आशिया चषक जिंकले आहे. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेली मालिकाही जिंकली आहे.  विश्वचषक मायदेशात असल्यामुळे या विश्वचषकात भारताचे पारडे जड मानले जात आहे.
  भारतामध्ये होऊ घातलेल्या विश्वचषक 2024 स्पर्धेच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या संघाचे काल हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.यावेळी भारताच्या वतीने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. सन 2008 मध्ये भारतातील मुंबई येथील ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये क्रिकेटची दुहेरी मालिका खेळवल्या जात नाहीत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी टूर्नामेंट, विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप अशा स्पर्धांच्या अनुषंगाने एकत्र खेळताना दिसतो.
यापूर्वी पाकिस्तानचा संघ 2017 मध्ये भारतात आला होता. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी हा संघ पुन्हा भारतात आला आहे.विश्वचषक 2024 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. त्या (World Cup 2023) अनुषंगाने 29 तारखेपासून सराव सामन्यांना सुरुवात होत असून पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज सराव सामना खेळवला जाणार आहे. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सराव सामना 30 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड सराव सामना होणार आहे.
  प्रत्यक्षात 5 ऑक्टोबर पासून विश्वचषकाला सुरुवात होणार असून पहिला सामना गत विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबाद येथे रंगणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा पहिला सामना चेन्नई येथे होणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दिल्ली येथे खेळवला जाणार आहे.

तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे सामना रंगणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश पुणे येथे एकमेकांशी भिडणार असून, 22 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना धरमशाला येथे खेळला जाणार आहे . 29 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड सामना लखनऊ येथे होणार आहे.
2 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका अशी टक्कर मुंबईत होईल. 5 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सामना कोलकत्ता येथे रंगणार आहे. भारताचा साखळी सामन्यातील शेवटचा सामना नेदरलँड विरुद्ध खेळवला जाईल. हा सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगलोर येथे होणार आहे.
विश्वचषकातला पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कलकत्ता येथे होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगणार आहे.
या विश्वचषकामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासह भारताला दावेदार मानण्यात (World Cup 2023) येत आहे. तर भारताने नुकतेच झालेले आशिया चषक जिंकले आहे. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेली मालिकाही जिंकली आहे. विश्वचषक मायदेशात असल्यामुळे या विश्वचषकात भारताचे पारडे जड मानले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.