Pimpri : मधुमेहदिनानिमित्त रविवारी निगडीत वॉकेथॉन 

एमपीसी न्यूज – जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, आयएमए पीसीबी आणि सुप्रिम क्लिनिक आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यामाने येत्या रविवारी (दि.18)निगडीत ‘वॉकेथॉन 2018’ चे आयोजन करण्यात आले आहे.
_MPC_DIR_MPU_II
निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथून रविवारी सकाळी साडेसहा वाजता  ‘वॉकेथॉन’ला सुरुवात होणार आहे. तीन किलोमीटर अंतराचा वॉकेथॉन असणार आहे. वॉकेथॉनमध्ये सहभागी होणा-यांच्या रक्तातील साखरेची उपाशीपोटी आणि खाल्यानंतर तपासणी करण्यात येणार आहे.
याशिवाय बीपी आणि डोळ्यांची तपासणी देखील केली जाणार आहे. डॉ. विनायक व डॉ. मानसी हराळे हे नागरिकांना मधुमेहासंदर्भात माहिती देणार आहेत. तसेच त्यासंदर्भात प्रदर्शनदेखील आयोजित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1