Moshi : मोशीत जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण व जनजागृती करून साजरा

एमपीसी न्यूज : मोशीतील  (Moshi)  संतनगर मित्र मंडळ , इंद्रायणी सेवा संघ व भूगोल फाउंडेशन तर्फे संतनगर येथील हनुमान मंदिर परिसरात पर्यावरणदिन साजरा करण्यात आला.

Education: दहावीनंतर ‘हा’ ठरु शकतो तुमच्यासाठी उत्तम पर्याय!

यावेळी आपल्या महाराष्ट्राच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  मा. नगरसेवक आणि स्थायी समिती मा.अध्यक्ष विलास मडीगेरी, मा.नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ लोंढे, संत साई इंग्लिश मिडीयम स्कुलचे संचालक शिवलिंगजी ढवलेश्वर, शिवप्रेमी रमेश तोत्रे, एमपीसी न्युजचे डायरेक्टर अनिल कातळे व इतर मान्यवर आणि संतनगर व परिसरातील नागरिक, महिला व मुले बहुसंख्येने हजर होते.
यावेळी महिलांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून मान्यवर, महिला व नागरिकांच्या हस्ते वड, पिंपळ, बेल, फणस, पारिजातक,अर्जुन, जास्वंद, चाफा, आपटा, कन्हेरी, तगर, कदंब, बकुळ, टिकोमा अशा विविध प्रकारचे देशी आयुर्वेदिक वृक्ष, व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्या अगोदर मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांनी आपण गेल्या १५ वर्षापासून करत असलेले वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, गड किल्ले स्वच्छता व संवर्धन, नदी स्वच्छता मोहीम, प्लॅस्टिक मुक्ती, पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती ,समाजप्रबोधन, पर्यावरण पूरक गणपती उत्सव, शिवजयंती, नवरात्र उत्सव, दीपोत्सव असे कार्यक्रम याविषयी माहिती देऊन याची सुरुवात स्वतः पासून करण्याचे आवाहन केले.

विलास माडीगेरी , प्रा. शिवलिंग ढवलेश्वर व शिवभक्त श्री रमेश तोत्रे यांनी आपली वसुंधरा व पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षांचे काय महत्व आहे हे विविध दाखले देऊन पटवून दिले आणि सर्वांना अशा उपक्रमात सहभागी होणे ही काळाची गरज आहे म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
यावेळी संतनगर परिसरातील मंडळ आणि संस्थाचे कार्यकर्ते, अनेक नागरिक उपस्थित होते.यावेळी कर्नल तानाजी अरबुज, अनिल जगताप, अरुणशेठ इंगळे, मारुती गायकवाड, नवनाथ कोलते, विठ्ठल वीर, संभाजी पडवळ, सतिश देशपांडे, राजेश डहाके,जयसिंहग कोहिनकर, मच्छिंद्र बुर्डे, साहेबराव गावडे, तुळशीदास शिंदे, भाउराव अहिरे, नेताजी पाटील, संतोष पाटील,गणेश हजारे, महादेव गोमे, संतोष पवार, माणिकराव मानकर , अजिंक्य पोटे, पोपट हिंगे, यादवराव जाधव, आनंद निघोट, शिवराम काळे, राजेंद्र ठाकूर, अनिल घाडगे,संजय रसाळ, केदार काका, धर्मा पाटील, अंकुश जाधव, एकनाथ फटांगडे, सुरेश फरताळे, जगदाळे साहेब, अभिनव सागडे,अंबादास कुमावत, ह्रषीकेश डहाके,रमेश पाटील,बिराजदार सर,शिवाजी लंके ,अशोक वाडेकर, चेअरमन अशोक यादव, अनिल पोवार,जक्कनवार, दत्तात्रय शिंदे, आदित्य पाटील असे अनेक पर्यावरणप्रेमी हजर होते.
तसेच महिलांमध्ये मंदा मानकर , शोभाताई फटांगडे, मंगल अहिरे, रोहिणी फरताळे, रोहिणी वाळुंज , बिराजदार ताई, भारती डहाके,  मेघा पाटील, सेजल वाळुंज,अपूर्वा वाळुंज, एरंडेताई, श्वेता पाटील असे   पर्यावरण प्रेमी नागरिक, महिला, मुले-मुली उपस्थित होते. सर्वात शेवटी सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.