World Heritage Site : तेराव्या शतकातील रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

एमपीसी न्यूज – तेराव्या शतकात बांधलेल्या रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यात असलेल्या पालमपेठमधील हे मंदिर रामाप्पा मंदिर या नावानेही ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या बैठकीत रविवारी हा निर्णय घेण्यात आला.

रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारे एक विशेष अद्भुत आहे. मंदिराच्या वास्तुविशारदाच्या नावावरून ते रामाप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी वर्ष 2019 मध्ये भारत सरकारतर्फे या एकमेव स्थळाचा नामनिर्देश केला गेला होता.

तेलंगणा राज्यातील वारंगळजवळील मालुगू जिल्ह्यातल्या पालमपेठ येथील रामप्पा मंदिर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रुद्रेश्वर मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून संयुक्त राष्ट्र शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था म्हणजेच युनेस्कोने मान्यता दिली, यासंदर्भात मार्गदर्शन तसेच सहकार्य दिल्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि इशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.