Akurdi : जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे डॉ.डी.वाय.पाटील औषधनिमार्णशास्त्र महाविद्यालयामध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आयपीए नामक राष्ट्रीय संर्स्थेतर्फे या वर्षासाठी निर्देशित केलेल्या या कार्यक्रमाची थीम फार्मासिस्टची भूमिका, रूग्णांची सुरक्षितता आणि औषधांची कार्यक्षमता अशी होती. या विषयानुरूप महाविदयालयातर्फे डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलस्थित आंतर महाविदयालयीन मोफत आरोग्य तपासणी शिबिर तथा समुपदेशन उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी प्रास्ताविकाद्वारे आरोग्य तपासणीची गरज व त्याद्वारे विविध रोगांवर यशस्वी मात यावर प्रकाश टाकला. या उपक्रमाचा संकुलातील वेगवेगळया महाविदयालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर मिळून सुमारे 300 कर्मचार्‍यांनी लाभ घेतला. महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ही आरोग्य तपासणी पार पाडली. हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा.ज्योत्स्ना चोपडे व प्रा.पूजा पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री बेहरा या विदयार्थीनीने केले व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी जय तातिया, मनोज खरात, अक्षय बावसकर, आरती ताकवणे या विदयार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like