World Record News : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड लंडन’मध्ये नोंद

एमपीसी न्यूज – ‘आयर्न मॅन’ किताब पटकविल्याबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयपीएस – आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील ॲड. संतोष शुक्ला आदींनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.