Pimpri : जागतिक क्रीडादिनानिमित्त पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन

एमपीसी न्यूज – व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये जागतिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला

_MPC_DIR_MPU_II

या वेळी शाळेचा ध्वजफडकवून व हॉकी प्लेयर ध्यानचंद सिंग यांच्या प्रतिमेस शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . विद्यार्थ्यांनी ध्यानचंद यांच्या विषयी बरीच माहिती सांगितली . ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप. ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. आज ते हयात नाही पण त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा भारतात खेल दिन ( जागतिक क्रीडा दिन ) म्हणून साजरा होतो.

तसेच विद्यार्थ्यांनी इतरही क्रीडा क्षेत्रात असलेल्या भारतीय खेळाडूविषयी माहिती सांगितली .व शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात खेळाचे असलेले महत्व सांगून त्यांनी दररोज अभ्यासाबरोबर खेळ हि खेळावेत यासाठी आपल्या भाषणातून प्रवृत्त केले. त्यानंतर जागतिक क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांच्या फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या . यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक राहुल कोरे व सायनाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.