Health News : जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त रुग्ण जागरुकता अभियान

एमपीसी न्यूज : जागतिक स्ट्रोक (पॅरालिसीस)  दिनानिमित्त न्यूरोलॉजिस्ट डॉ. एस. के. नंदा यांनी आपल्या देशातील ब्रेन स्ट्रोकची (पॅरालिसीस)  काही सामान्य कारणे आणि त्याची लक्षणे याविषयी माहिती दिली आहे.

आज वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे. मधूमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या रोगांच्या ओझ्यामुळे भविष्यात पॅरालिसीस त्चे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ब्रेन स्ट्रोक (पॅरालिसीस)  हा इस्केमिक (ब्लड क्लोट) किंवा रक्तस्त्राव स्वरुपाचा असू शकतो.

स्ट्रोकच्या (पॅरालिसीस)  सुरुवातीच्या लक्षणांविषयी समाजाला जागरूक करणे आणि रुग्णास रुग्णालयात त्वरित पोहचविण्या-विषयी समाजाला जागरूक करने महत्वाचे आहे. ज्यासाठी फास्ट (‘FAST’) ही संकल्पना समजणे महत्वाची ठरते.

‘फास्ट’ म्हणजे फेस, आर्म, स्पीच आणि टाईम या संकल्पने द्वारे स्ट्रोकची (पॅरालिसीस)  संभावित लक्षणे समजुन घेणे. म्हणजेच चेहर् याचे होणारे बदल, वेगळे हावभाव, हातांचा अशक्त पणा आणि बोलण्यात होणारा अडथळा यास वेळत ओळखुन रुग्णास वेळेत रुग्णालयात दाखल करणे.

तथापि, अशा परिस्थितीस ‘टाइम इज् ब्रेन’ म्हणता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर आपण यात विलंब केला तर् कदाचित तो कायमचा विलंब ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III