World Update: अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे 1321 बळी, जगात कोरोनाचे 11 लाख रुग्ण, 59 हजार मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 11 लाखांचा टप्पा जवळजवळ गाठला आहे. आज (शनिवारी) सकाळर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 98 हजार 762 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 59 हजार 172 पर्यंत वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 28 हजार 923 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 8 लाख 10 हजार 667 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 39 हजार 391 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील एका दिवसात जगभरात 7,300 हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे 1,321 बळी गेले आहेत. गेल्या तीन दिवसांत अमेरिकेत तब्बल 3 हजार 339 बळी गेले आहेत. अमेरिकेने कोरोनाबाधितांचा पावणेतीन लाखांचा आकडा ओलांडला आहे. एकूण 2 लाख 77 हजार 467 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 7 हजार 402 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इटलीत 1 लाख 19 हजार 827 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 14 हजार 681 पर्यंत वाढला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 19 हजार 199 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 11 हजार 198 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्या चीनला मागे टाकत जर्मनीत कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जर्मनीत एकूण 91 हजार 159 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.  जर्मनीत आतापर्यंत 1 हजार 275 कोरोनाबाधित मृत्युमुखी पडले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 639 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 हजार 326 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनने कोरोनाचा प्रसार व बळींची संख्या दोन्हींवर नियंत्रण मिळविले असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे.

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

फ्रान्स – 64,338 (6,507)

इराण – 53,183 (3,294)

यूके – 38,168 (3,605)

टर्की – 20,921 (425)

स्वित्झर्लंड  – 19,606 (591)

बेल्जियम – 16,770 (1,143)

नेदरलँड – 15,723 (1,487)

कॅनडा – 12,375 (208)

ऑस्ट्रीया – 11,524 (168)

दक्षिण कोरिया – 10,156 (177)

पोर्तुगाल – 9,886 (246)

ब्राझील – 9,216 (365)

इस्राईल – 7,428 (40)

स्वीडन – 6,131 (358)

ऑस्ट्रेलिया – 5,454 (28)

नॉर्वे – 5,370 (59)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.