World Update: कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आता 16 व्या स्थानावर

जगातील कोरोनाबाधितांची संख्या 27,25,035 तर कोरोनाच्या बळींची संख्या 1,90,919

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 लाख 25 हजार 035 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 90 हजार 919 (7 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 45 हजार 413 (27.35 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 17 लाख 86 हजार 712 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 17 लाख 29 हजार 497 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 58 हजार 678 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत भारत 17 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

19 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 804     दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 984

20 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 931     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 366

21 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 254     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 062

22 एप्रिल – नवे रुग्ण 79 हजार 959     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 607

23 एप्रिल – नवे रुग्ण 85 हजार 434     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 618

अमेरिकेत काल 2 हजार 342 कोरोनाबाधितांचा काल मृत्यू झाला. अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 50 हजारांच्या घरात जाऊन पोहचला आहे.  कोरोनाबाधितांचा एक लाखांचा टप्पा ओलांडणारा टर्की हा सातवा देश ठरला आहे. टर्कीतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 01 हजार 790 इतकी झाली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 8,86,442 (+31,900), मृत 50,236 (+2,342)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,13,024 (+4,635), मृत 22,157 (+440)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,89,973 (+2,646), मृत 25,549 (+464)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,58,183 (+2,239), मृत 21,856 (+516)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,53,129 (+2,481), मृत 5,575 (+260)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 1,38,078 (+4,583), मृत 18,738 (+638)
  7. टर्की – कोरोनाबाधित 101,790 (+3,116), मृत 2,491 (+115)
  8. इराण – कोरोनाबाधित 87,026 (+1,030), मृत 5,481 (+90)
  9. चीन – कोरोनाबाधित 82,798 (+10), मृत 4,632 (+0)
  10. रशिया – कोरोनाबाधित 62,773 (+4,774), मृत 555 (+42)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 49,492 (+3,735), मृत 3,313 (+407)
  12. बेल्जियम – कोरोनाबाधित 42,797 (+908), मृत 6,490 (+228)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 42,110 (+1,920), मृत 2,147 (+173) 
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 35,729 (+887) , मृत 4,177 (+123)
  15. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 28,496 (+228), मृत 1,549 (+40)
  16. भारत – कोरोनाबाधित 23,039 (+1,669) , मृत 721 (+40)
  17. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 22,353 (+371), मृत 820 (+35)
  18. पेरू –  कोरोनाबाधित 20,914 (+1,664) , मृत 572 (+42)   
  19. आयर्लंडकोरोनाबाधित 17,607 (+936) , मृत 794 (+25)
  20. स्वीडन – कोरोनाबाधित 16,755 (+751), मृत 2,021 (+84)       

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.