World Update: जगभरात सव्वासात लाख जणांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा 34 हजारच्या घरात!

एमपीसी न्यूज – जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या सात लाख 22 हजार 196 झाली असून मृतांचा आकडा 33 हजार 976 पर्यंत जाऊन पोहचला आहे. हे दोन्हीे आकडे वाढत असतानाच जगभरातील दीड लाखपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बातमीही हाती आली आहे.

काल इटलीमध्ये एका दिवसात कोरोनाने 756 जणांचा बळी घेतला. त्यामुळे या देशातील कोरोनाच्या बळींचा एकूण आकडा 10 हजार 779 झाली आहे. स्पेनमध्ये काल एका दिवसात 624 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या देशातील कोरोना बळींची आकडा 6 हजार 803 झाला आहे.

दीड लाख रुग्णांची कोरोनावर मात

जगभरात एक लाख 51 हजार 766 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे, ही एक मोठी आशादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाबाधितांचे आणि कोरोनाच्या बळींचे आकडे झपाट्याने वाढत असल्याने जगभर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या पण वाढत आहे, ही गोष्ट सर्वांनाच दिलासा देणारी आहे.

अजूनही पाच लाख 36 हजार 454 सक्रिय कोरोनाग्रस्त

दीड लाख पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असले तरी अजूनही पाच लाख 36 हजार 454 सक्रिय कोरोनाग्रस्त जगभरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून त्यापैकी 26 हजार 681 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. हे रुग्ण मृत्यूशी झुंज देत असून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेत मृतांचा आकडा वाढण्याची भीतीे

अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा एक लाखपेक्षाही अधिक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 42 हजार 178 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मृतांचा आकडा 2 हजार 484 झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 559 रुग्ण बरे झाले असले तरी अजूनही 1 लाख 35 हजार 135 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 2 हजार 970 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

जगाभरातील कोरोनाबाधित प्रमुख देशांमधील कोरोनाबाधित रुग्णांचे आकडेवारीे पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचा आकडा दिला आहे.

अमेरिका – 1,42,178 (2,484)

इटली – 97,689 (10,779)

चीन – 81,470 (3,304)

स्पेन – 80,110 (6,803)

जर्मनी – 62,435 (541)

फ्रान्स – 40,174 (2,606)

इराण – 38,309 (2,640)

यूके – 19,522 (1,228)

स्वित्झर्लंड – 14,829 (300)

नेदरलँड्स – 10,866 (771)

बेल्जियम – 10,836 (431)

दक्षिण कोरिया – 9,661 (158)

टर्की – 9,217 (131)

ऑस्ट्रीया – 8,788 (86)

कॅनडा – 6,320 (65)

पोर्तुगाल – 5,962 (119)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.