World Update: जगातील 98 टक्के कोरोना रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा, गंभीर रुग्ण केवळ दोन टक्के

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – जगात आता कोरोनाचे 20 लाख 79 हजार 801 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 20 लाख 28 हजार 446 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 51,355 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. कालपर्यंत गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णांची टक्केवारी तीन होती. त्यातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 34 लाख 01 हजार 002 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 39 हजार 602 (7.05 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 10 लाख 81 हजार 599 (31.8 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

27 एप्रिल – नवे रुग्ण 69 हजार 206  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 532

28 एप्रिल – नवे रुग्ण 76 हजार 562  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 365

29 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 678  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 593

30 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 037  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 801

1 मे – नवे रुग्ण 94 हजार 552  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 624

अमेरिकेत काल (गुरूवारी) एका दिवसांत 1,897 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 65,753 झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 11 लाखांवर गेला आहे. ब्रिटनमध्ये काल दिवसभरात 739 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ब्राझीलमध्ये 509 मृत्यूंची नोंद झाली आहे स्पेनमध्ये कोरोनाचे 281, इटलीत 269, फ्रान्समध्ये 218 तर कॅनडामध्ये 207 बळी गेले आहेत.

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल पेरू आणि इक्वाडोर या दोन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. पेरू 15 व्या स्थानावरून 14 व्या  स्थानावर पोहचला, नेदरलँड 14 व्या स्थानावरून 15 व्या स्थानावर गेला आहे तर इक्वाडोर 19 व्या स्थानावरून 18 व्या स्थानावर गेला आहे. पोर्तुगाल 18 व्या स्थानावरून 19 व्या स्थानावर गेला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 11,31,030 (+36,007), मृत 65,753 (+1,897)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,42,988 (+3,648), मृत 24,824 (+281)
  3. इटली – कोरोनाबाधित 2,07,428 (+1,965), मृत 28,236 (+269)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 1,77,454 (+6,201), मृत 27,510 (+739)
  5. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,67,346 (+168), मृत 24,594 (+218)
  6. जर्मनी – कोरोनाबाधित 1,64,077 (+1,068), मृत 6,736 (+113)
  7. टर्की – कोरोनाबाधित 1,22,392 (+2,188), मृत 3,258 (+84)
  8. रशिया – कोरोनाबाधित 1,14,431 (+7,933), मृत 1,169 (+96)
  9. इराण – कोरोनाबाधित 95,646 (+1,006), मृत 6,091 (+63)
  10. ब्राझील – कोरोनाबाधित 92,109 (+6,729), मृत 6,410 (+509)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,874 (+12), मृत 4,633 (+0)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 55,061 (+1,825), मृत 3,391 (+207)
  13. बेल्जियम – कोरोनाबाधित 49,032 (+513), मृत 7,703 (+109)
  14. पेरू –  कोरोनाबाधित 40,459 (+3,483) , मृत 1,124 (+73) 
  15. नेदरलँड – कोरोनाबाधित 39,791 (+475), मृत 4,893 (+98)
  16. भारत – कोरोनाबाधित 37,257 (+2,394) , मृत 1,223 (+69)
  17. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 29,705 (+119), मृत 1,754 (+17)
  18. इक्वाडोर – कोरोनाबाधित 26,336 (+1,402), मृत 1,063 (+163)
  19. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 25,351 (+306), मृत 1,007 (+18)
  20. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 24,097 (+1,344) , मृत 169 (+7) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.