World Update: बापरे! जगात कोरोनाच्या बळींची आकडा पाऊण लाखाच्या घरात! कोरोनाबाधितांची संख्या साडेतेरा लाखांवर!

एका दिवसांत अमेरिकेत 1,255 बळी, फ्रान्समध्ये 833, स्पेनमध्ये 700, इटलीत 636 तर ब्रिटनमध्ये 429 बळी

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची संख्या कालच्या (सोमवार) एका दिवसात 73 हजार 135 ने वाढल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने साडेतेरा लाखांचा टप्पा जवळजवळ गाठला आहे. एक लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या अमेरिका, स्पेन, इटली व जर्मनी या चार देशांच्या पाठोपाठ फ्रान्स देखील एक लाखाच्या उंबरठ्यापर्यंत पोहचला आहे. आज (मंगळवार) सकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 लाख 46 हजार 566 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 5 हजार 227 वाढून पाऊणलाखाच्या घरात गेला आहे म्हणजे  74 हजार 696 झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 695 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 9 लाख 93 हजार 175 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 47 हजार 256 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. दिवसभरात एकट्या अमेरिकेत 1 हजार 255 बळी गेले आहेत.  

अमेरिकेने ओलांडला 10 हजार बळींचा टप्पा

अमेरिकेने कोरोनाबाधितांचा साडेतीन लाखांचा आकडा तर मृतांच्या आकड्याने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण 3 लाख 67 हजार 004 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 10 हजार 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात अमेरिकेत रुग्ण संख्येत 30 हजार 331 ने तर मृतांच्या संख्येत 1,255 वाढ झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क. न्यू जर्सी, मिशीगन, कॅलिफोर्निया, ल्युसियाना, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

स्पेनमध्ये 13 हजार 341 बळी 

स्पेनने इटलीला मागे टाकत कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसरा क्रमांक मिळवला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 36 हजार 675 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 13 हजार 341 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये काल (सोमवारी) 700 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 5 हजार 29 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

इटलीत एका दिवसात 636 बळी

इटलीत एकूण 1 लाख 32 हजार 547 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 16 हजार 523 पर्यंत वाढला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत एकूण 636 बळी गेले आहेत. या देशांत काल दिवसभरात कोरोनाचे 3  हजार 599 नवे रुग्ण आढळून आले.

जर्मनी पाठोपाठ फ्रान्सही ओलांडणार एक लाखांचा टप्पा

अमेरिका, इटली, स्पेन व जर्मनी पाठोपाठ फ्रान्सही आता कोरोनाबाधित रुग्णांचा एक लाखांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. एक लाखपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला हा जगातील पाचवा देश ठरणार आहे. जर्मनीतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 03 हजार 375 झाला आहे. जर्मनीत आतापर्यंत 1 हजार 810 कोरोनाबाधित मृत्युमुखी पडले आहेत. एका दिवसात जर्मनीत 226 बळी गेले असून 3 हजार 252 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये 98 हजार 010 कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत एकूण 8 हजार 911 बळी गेले आहेत. फ्रान्समध्ये एक दिवसात 833 बळी गेले असून कोरोनाचे नवीन 5 हजार 171 रुग्ण सापडले आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान अतिदक्षता विभागात, रुग्ण संख्या 51 हजारांवर

कोरोना संसर्गित असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. इंग्लंडमध्ये काल दिवसभरात 429 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नवीन 3 हजार 802 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये एकूण रुग्णसंख्या 51 लाख 608 तर मृतांची संख्या 5 हजार 373 झाली आहे.   

चीनमधील परिस्थिती आता नियंत्रणाखाली

चीनने कोरोनाचा प्रसार व बळींची संख्या दोन्हींवर नियंत्रण मिळविले असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरोनाची लागण सुरू झाली त्या चीनमध्ये आतापर्यंत एकूण 81 हजार 740 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरात केवळ 32 नवे रुग्ण आढळले तर एकही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही, ही काहीसा दिलासा देणारी गोष्ट आहे. आतापर्यंत 3 हजार 331 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या इतर देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

इराण – 60,500 (3,739)

टर्की – 30,217 (649)

स्वित्झर्लंड  – 21,657 (765) 

बेल्जियम – 20,814 (1,632)

नेदरलँड – 18,803 (1,867) 

कॅनडा – 16,667 (323) 

ऑस्ट्रीया – 12,297 (220)

ब्राझील – 12,232 (566)

पोर्तुगाल – 11,730 (311) 

दक्षिण कोरिया – 10,331 (192)

इस्राईल – 8904 (57) 

स्वीडन – 7206 (477) 

रशिया – 6,343 (47)

ऑस्ट्रेलिया – 5,895 (45)

नॉर्वे – 5,865 (76)

आयर्लंड – 5364 (174)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.