World Update: कोरोनाबाधितांची संख्या 35 लाखांच्या उंबरठ्यावर, मृतांचा आकडा दोन लाख 44 हजारांवर

जगात कोरोनामुक्तांचे प्रमाण 32.19 पर्यंत वाढले, 11 लाखांवर रुग्णांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 34 लाख 84 हजार 502 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 44 हजार 781 (7.02 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 11 लाख 21 हजार 608 (32.19 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 21 लाख 18 हजार 113 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 20 लाख 67 हजार 251 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 51,355 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. काल नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे त्याच बरोबर कोरोनामुक्तांचा टक्का देखील वाढला आहे, ही बाब दिलासादायक आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

28 एप्रिल – नवे रुग्ण 76 हजार 562  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 365

29 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 678  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 593

30 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 037  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 801

1 मे – नवे रुग्ण 94 हजार 552  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 624

2 मे – नवे रुग्ण 83 हजार 255  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 215

अमेरिकेत काल (गुरूवारी) एका दिवसांत 1,691 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 67,444 झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 11 लाख 60 हजार 774 वर पोहचला आहे. ब्रिटनमध्ये काल दिवसभरात 621 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. इटलीत 474, ब्राझीलमध्ये 340, इक्वाडोरमध्ये 308 मृत्यूंची नोंद झाली आहे स्पेनमध्ये कोरोनाचे 276, कॅनडामध्ये 175 तर फ्रान्समध्ये 166 बळी गेले आहेत. स्पेनने कोरोनाबाधित मृतांचा 25 हजारांचा टप्पा आज ओलांडला.

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल ब्राझील आणि सौदी अरेबिया या दोन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. ब्राझील 10 व्या स्थानावरून नवव्या स्थानावर पोहचला, इराण नवव्या स्थानावरून 10 व्या स्थानावर गेला आहे तर सौदी अरेबिया 20 व्या स्थानावरून 19 व्या स्थानावर गेला आहे. पोर्तुगाल 19 व्या स्थानावरून 20 व्या स्थानावर गेला आहे. 

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 11,60,774 (+29,744), मृत 67,444 (+1,691)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,45,567 (+2,588), मृत 25,100 (+276)
  3. इटली – कोरोनाबाधित 2,09,328 (+1,900), मृत 28,710 (+474)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 1,82,260 (+4,806), मृत 28,131 (+621)
  5. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,68,396 (+1,050), मृत 24,760 (+166)
  6. जर्मनी – कोरोनाबाधित 1,64,967 (+890), मृत 6,812 (+76)
  7. टर्की – कोरोनाबाधित 1,24,375 (+1,983), मृत 3,336 (+78)
  8. रशिया – कोरोनाबाधित 1,24,054 (+9,623), मृत 1,222 (+53)
  9. ब्राझील – कोरोनाबाधित 96,559 (+4,450), मृत 6,750 (+340)
  10. इराण – कोरोनाबाधित 96,448 (+802), मृत 6,156 (+65)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,875 (+1), मृत 4,633 (+0)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 56,714 (+1,653), मृत 3,566 (+175)
  13. बेल्जियम – कोरोनाबाधित 49,517 (+485), मृत 7,765 (+62)
  14. पेरू –  कोरोनाबाधित 42,534 (+2,075) , मृत 1,200 (+76) 
  15. नेदरलँड – कोरोनाबाधित 40,236 (+445), मृत 4,987 (+94)
  16. भारत – कोरोनाबाधित 39,699 (+2,442) , मृत 1,323 (+100)
  17. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 29,817 (+112), मृत 1,762 (+8)
  18. इक्वाडोर – कोरोनाबाधित 27,464 (+1,128), मृत 1,371 (+308)
  19. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 25,459 (+1,362) , मृत 176 (+7) 
  20. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 25,190 (+203), मृत 1,023 (+16)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.