World Update: कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 15 हजार 466, मृतांची संख्या 53 हजार 190!

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (शुक्रवारी) सकाळर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 15 हजार 466 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 53 हजार 190 पर्यंत वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 12 हजार 315 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 7 लाख 50 हजार 047 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 37 हजार 696 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

अमेरिकेने कोरोनाबाधितांचा दोन लाखांचा आकडा ओलांडला आहे.  एकूण 2 लाख 45 हजार 066 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 6,075 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीत 1 लाख 15 हजार 242 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 13 हजार 915 पर्यंत वाढला आहे. इटली पाठोपाठ स्पेनने कोरोना बळींचा 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 12 हजार 065 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 10 हजार 348 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्या चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 589 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3,318 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

जर्मनी – 84,794 (1,107)

फ्रान्स – 59,105 (5,387)

इराण – 50,468 (3,160)

यूके – 33,718 (2,912)

स्वित्झर्लंड – 18,827 (536)

टर्की – 18,135 (356)

बेल्जियम – 15,348 (1,011)

नेदरलँड – 14,697 (1,339)

ऑस्ट्रीया – 11,129 (158)

दक्षिण कोरिया – 10,062 (174)

कॅनडा – 11,283 (173)

पोर्तुगाल 9,034 (209)

ब्राझील 8,044 (324)

इस्राईल 6,857 (36)

स्वीडन 5,568 (308)

ऑस्ट्रेलिया 5,134 (25)

नॉर्वे 5147 (50)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.