World Update: कोरोनाबाधितांची संख्या 33 लाखांवर तर मृतांचा आकडा 2 लाख 33 हजार 830 वर

एमपीसी न्यूज  – जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 33 लाख 04 हजार 220 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 33 हजार 830 (7.07 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 10 लाख 39 हजार 058 (31.45 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 20 लाख 31 हजार 332 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 19 लाख 80 हजार 602 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 50 हजार 937  (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

26 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 858  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 751

27 एप्रिल – नवे रुग्ण 69 हजार 206  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 532

28 एप्रिल – नवे रुग्ण 76 हजार 562  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 365

29 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 678  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 593

30 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 037  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 801

अमेरिकेत काल (गुरूवारी) एका दिवसांत 2,201 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 63,856 झाला आहे. ब्रिटनमध्ये काल दिवसभरात 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ब्राझीलमध्ये 390 मृत्यूंची नोंद झाली आहे स्पेनमध्ये कोरोनाचे 268, इटलीत 285, तर फ्रान्समध्ये 289 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत इंग्लंड चौथ्या स्थानी

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल इंग्लंड, ब्राझील व पोर्तुगाल या तीन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. इंग्लंड पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहचला, तर ब्राझील 11 व्या स्थानावरून 10 व्या स्थानावर गेला आहे. पोर्तुगाल 19 व्या स्थानावरून 18 व्या स्थानावर पोहचला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 10,95,023 (+30,829), मृत 63,856 (+2,201)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 239,639 (+2,740), मृत 24,543 (+268)
  3. इटली – कोरोनाबाधित 2,05,463 (+1,872), मृत 27,967 (+285)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 1,71,253 (+6,032), मृत 26,771 (+674)
  5. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,67,178 (+758), मृत 24,376 (+289)
  6. जर्मनी – कोरोनाबाधित 1,63,009 (+1,470), मृत 6,623 (+156)
  7. टर्की – कोरोनाबाधित 1,20,204 (+2,615), मृत 3,174 (+93)
  8. रशिया – कोरोनाबाधित 1,06,498 (+7,099), मृत 1,073 (+101)
  9. इराण – कोरोनाबाधित 94,640 (+983), मृत 6,028 (+71)
  10. ब्राझील – कोरोनाबाधित 85,380 (+6,019), मृत 5,901 (+390)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,862 (+4), मृत 4,633 (+0)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 53,236 (+1,639), मृत 3,184 (+188)
  13. बेल्जियम – कोरोनाबाधित 48,519 (+660), मृत 7,594 (+93)
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 39,316 (+514), मृत 4,795 (+84)
  15. पेरू –  कोरोनाबाधित 36,976 (+3,045) , मृत 1,051 (+108) 
  16. भारत – कोरोनाबाधित 34,863 (+1,801) , मृत 1,154 (+75)
  17. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 29,586 (+179), मृत 1,737 (+21)
  18. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 25,045 (+540), मृत 989 (+16)
  19. इक्वाडोर – कोरोनाबाधित 24,934 (+259), मृत 900 (+17)
  20. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 22,753 (+1,351) , मृत 162 (+5) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.