World Update : जगातील कोरोनाबाधितांची संख्या आठ लाखांच्या पुढे, मृतांची संख्या 39 हजार 25!

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (मंगळवारी) संध्याकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख तीन हजार 11 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 39 हजार 25 पर्यंत वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 396 इतकी आहे. त्यामुळे अजून जगभरात 5 लाख 91 हजार 590 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 30 हजार 409 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

जगभरात आज एकूण 19 हजार 533 कोरोनाबाधित नवे रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 1 हजार 685 ने वाढली आहे. अमेरिकेच्या पाठोपाठ इटलीमध्येही कोरोनाबाधिेतांची संख्या एक लाखच्या पुढे गेली आहे. अमेरिकेत 1लाख 64 हजार 435 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 3,175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीत 1 लाख 01 हजार 739 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 11 हजार 591 पर्यंत वाढला आहे.

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

स्पेन – 94,417 (8,189)

चीन – 81518 (3305)

जर्मनी – 67051 (682)

इराण – 44,605 (2898)

फ्रान्स – 44550 (3024)

यूके – 22141 (1808)

स्वित्झर्लंड – 16186 (395)

बेल्जियम – 12775 (705)

नेदरलँड – 12595 (1039)

टर्की – 10827 (168)

ऑस्ट्रीया – 10,019 (128)

दक्षिण कोरिया – 9786 (162)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.