World Update: कोरोनाबाधितांची संख्या नऊ लाखांवर तर मृतांचा आकडा 45,299!

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने नऊ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (बुधवारी) संध्याकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नऊ लाख दोन हजार 504 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 45 हजार 299 पर्यंत वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 90 हजार 637 इतकी आहे. त्यामुळे अजून जगभरात 6 लाख 66 हजार 568 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 34 हजार 855 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

जगभरात आज एकूण 44 हजार 031 कोरोनाबाधित नवे रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 6 हजार 274 ने वाढली आहे. अमेरिका, इटली पाठोपाठ स्पेनमध्येही कोरोनाबाधिेतांची संख्या एक लाखच्या पुढे गेली आहे.

अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या पायरीपर्यंत जाऊन पोहचला आहे.  एकूण 1 लाख 99 हजार 067 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 4,366 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीत 1 लाख 10 हजार 574 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 13 हजार 155 पर्यंत वाढला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 2 हजार 136 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 9 हजार 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

चीन – 81,554 (3,312)

जर्मनी – 75,754 (848)

फ्रान्स – 52,128 (3,523)

इराण – 47,593 (3,036)

यूके – 29,474 (2,352)

स्वित्झर्लंड – 17,137 (461)

बेल्जियम – 13,964 (828)

नेदरलँड – 13,614 (1,173)

टर्की – 13,531 (214)

ऑस्ट्रीया – 10,585 (146)

दक्षिण कोरिया – 9,887 (165)

कॅनडा – 9,017 (108)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.