World Update: कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृतांच्या संख्येचा आलेख खालच्या दिशेने

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19,23,848 तर मृतांचा आकडा 1,19,194

एमपीसी न्यूज – जगात कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी नवीन रुग्ण वाढीचा वेग तसेच नवीन मृत्यूंचा वेग आता मंदावू लागल्याचे सलग पाचव्या दिवशी दिसून येत आहे, ही बाब आशादायक आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जगभर सुरू असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागल्याचे पहायला मिळत आहे. जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19 लाख 23 हजार 848 वर जाऊन पोहचली असून कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 लाख 19 हजार 194 इतका झाला आहे. 

आतापर्यंत 4 लाख 44 हजार 636 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  जगात आता कोरोनाचे 13 लाख 59 हजार 594 इतके सक्रिय असून त्यापैकी 13 लाख 08 हजार 358 रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 51 हजार 742 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील पाच दिवसांतील जगातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या यावर नजर टाकली तर दोन्हींच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

9 एप्रिल –  नवे रुग्ण 85 हजार 638 ,  दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 274

10 एप्रिल –  नवे रुग्ण 94 हजार 629,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 973

11 एप्रिल –  नवे रुग्ण 80 हजार 961,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 092

12 एप्रिल –  नवे रुग्ण 72 हजार 523   दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 415

13 एप्रिल – नवे रुग्ण 71 हजार 591     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 423

अमेरिकेत 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 33,752 (मृत 2,035) होती, ती 13 एप्रिलला 26,641 (मृत 1,535) आहे.  ब्रिटनमध्ये 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 8,681 (मृत 980) होती, ती 13 एप्रिलला 4,342 (मृत 717) आहे. स्पेनमध्ये 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 5,051 (मृत 634) होती, ती 13 एप्रिलला 3,268 (मृत 547) आहे.  इटलीमध्ये 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 3,951 (मृत 570) होती, ती 13 एप्रिलला 3,153 (मृत 566) आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 5,86,941 (+26,641), मृत 23,640 (+1,535)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 1,70,099 (+3,268), मृत 17,756 (+547)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,59,516 (+3,153), मृत 3,153 (+566)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,36,779 (+4,188), मृत 14,967 (+574)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,30,072 (+2,218), मृत 3,194 (+172)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 88,621 (+4,342), मृत 11,329 (+717)
  7. चीन – कोरोनाबाधित  82,160 (+108), मृत 3,341 (+2)
  8. इराण – कोरोनाबाधित 73,303 (+1,617), मृत 4,585 (+111)
  9. टर्की – कोरोनाबाधित 61,049 (+4,093), मृत 1,296 (+98)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 30,589 (+942), मृत3,903 (+303)
  11. नेदरलँड – कोरोनाबाधित 26,551 (+964) , मृत 2,823 (+86)
  12. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 25,688 (+273), मृत 1,138 (+32)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 25,680 (+1,297), मृत 780 (+63) 
  14. ब्राझील – कोरोनाबाधित 23,430 (+1,238), मृत 1,328 (+105)
  15. रशिया – कोरोनाबाधित 18,328 (+2,558), मृत 148 (+18)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 16,934 (+349), मृत 535 (+31)
  17.  ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,041 (+96), मृत 368 (+18)
  18. इस्राईल – कोरोनाबाधित 11,586 (+441) , मृत 116 (+13)
  19. स्वीडन – कोरोनाबाधित 10,948 (+465) , मृत 919 (+20)
  20. आयर्लंडकोरोनाबाधित 10,647 (+992) , मृत 365 (+31) 
  21. दक्षिण कोरिया – कोरोनाबाधित 10,537 (+25), मृत 217 (+3)
  22. भारत – कोरोनाबाधित 10,453 (+1,248) , मृत 358 (+27)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.