World Update: गुड न्यूज! जगातील तब्बल 10 लाख 33 जणांनी केली कोरोना विषाणूवर मात

जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी 31 पर्यंत वाढली

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – जगातील कोरोनाबाधितांची आणि कोरोनाच्या बळींचे वाढणारे आकडे पाहून पोटात धस्स होत असतानाच कोरोनामुक्तांच्या संख्येकडे मात्र लोकांचे काहीसे दुर्लक्ष होत आहे. त्याच ठिकाणी आपल्याला चांगली आशादायक माहिती मिळत आहे. जगात थोडे-थोडके नव्हे तर तब्बल 10 लाख 33 कोरोनाबाधितांनी कोरोना विषाणूवर मात करण्यात यश मिळविले आहे. कोणतेही ठोस औषध किंवा उपचारपद्धतीचा शोध लागलेला नसताना देखील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आता 31.07 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही खूपच मोठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. 

जगातील देशनिहाय कोरोनामुक्तांची संख्या व टक्केवारी यावर नजर टाकूयात! अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येप्रमाणेच कोरोनामुक्तांची संख्या देखील जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 47 हजार 411 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. हे प्रमाण 13.85 टक्के आहे. चीनकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये 77 हजार 578 म्हणजेच तब्बल 93.62 टक्के कोरोनाबाधित बरे झाले आहेत. मात्र चीनकडून आकडेवारी नियमित अपडेट केली जात नसल्याबद्दल जगभरात या आकड्यांबाबत साशंकता आहे. स्पेनमध्ये 1,32,929 (56.11 टक्के), जर्मनीत 1,20,400 (74.53 टक्के), इराणमध्ये 73,578 (78.56 टक्के) तर इटलीमध्ये 71,252 ( 35 टक्के) कोरोनाबाधित बरे झाले आहेत. कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा काही प्रमाणात मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.

भारतात कोरोनाचे 25.52 टक्के रुग्ण बरे

भारतात आतापर्यंत नोंद झालेल्या एकूण 33,062 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 8,437 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. भारतातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण हे 25.52 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे पहायला मिळत आहे. भारतात कोरोनाचा मृत्यूदर हा जगातिक मृत्यूदराच्या निम्म्याहून कमी आहे. 

जगात कोरोनाबाधितांची संख्या 32 लाखांवर, सव्वादोन लाख बळी 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 32 लाख 18 हजार 184 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 28 हजार 030 (7.09 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 10 लाख 33 (31.07 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 19 हजार 90 हजार 121 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 19 लाख 31 हजार 819 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 59,811 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

25 एप्रिल – नवे रुग्ण 90 हजार 722  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 069

26 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 858  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 751

27 एप्रिल – नवे रुग्ण 69 हजार 206  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 532

28 एप्रिल – नवे रुग्ण 76 हजार 562  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 365

29 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 678  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 593

अमेरिकेत काल (बुधवारी) एका दिवसांत 2,390 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 61,656 झाला आहे. ब्रिटनमध्ये काल दिवसभरात 795 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ब्राझीलमध्ये 448 मृत्यूंची नोंद झाली आहे स्पेनमध्ये कोरोनाचे 453, इटलीत 323, तर फ्रान्समध्ये 427 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत इंग्लंड पाचव्या तर रशिया आठव्या स्थानी

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल पेरू आणि इक्वाडोर या दोन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. पेरू 16 व्या स्थानावरून 15 व्या स्थानावर पोहचला, तर भारत 15 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर गेला आहे. इक्वाडोर 19 व्या स्थानावरून 18 व्या स्थानावर पोहचला आहे. पोर्तुगाल 18 व्या स्थानावरून 19 व्या स्थानावर गेला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 10,64,194 (+28,429), मृत 61,656 (+2,390)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,36,899 (+4,771), मृत 24,275 (+453)
  3. इटली – कोरोनाबाधित 2,03,591 (+2,086), मृत 27,682 (+323)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,66,420 (+509), मृत 24,087 (+427)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 1,65,221 (+4,076), मृत 26,097 (+795)
  6. जर्मनी – कोरोनाबाधित 1,61,539 (+1,627), मृत 6,467 (+153)
  7. टर्की – कोरोनाबाधित 1,17,589 (+2,936), मृत 3,081 (+89)
  8. रशिया – कोरोनाबाधित 99,399 (+5,841), मृत 972 (+105)
  9. इराण – कोरोनाबाधित 93,657 (+1,073), मृत 5,957 (+80)
  10. चीन – कोरोनाबाधित 82,858 (+22), मृत 4,633 (+0)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 79,361 (+6,462), मृत 5,511 (+448)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 51,597 (+1,571), मृत 2,996 (+137)
  13. बेल्जियम – कोरोनाबाधित 47,859 (+525), मृत 7,501 (+170)
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 38,802 (+386), मृत 4,711 (+145)
  15. पेरू –  कोरोनाबाधित 33,931 (+2,741) , मृत 943 (+89) 
  16. भारत – कोरोनाबाधित 33,062 (+1,738) , मृत 1,079 (+71)
  17. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 29,407 (+143), मृत 1,716 (+17)
  18. इक्वाडोर – कोरोनाबाधित 24,675 (+417), मृत 883 (+12)
  19. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 24,505 (+183), मृत 973 (+25)
  20. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 21,402 (+1,325) , मृत 157 (+5) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.