World Update: गुड न्यूज! कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 30 टक्के, जगात 9 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

जगात कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांच्या पुढे तर अमेरिकेत 10 लाखांच्या पुढे, जागतिक क्रमवारीत भारत आता 15 व्या स्थानी

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येने काल (सोमवारी) 30 लाखांचा तर अमेरिकेतील कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 30,62,476 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2,11,449 (6.9 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 9,21,314 (30 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 19,29,713 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 18,74,525 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 56,300 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

22 एप्रिल – नवे रुग्ण 79 हजार 959     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 607

23 एप्रिल – नवे रुग्ण 85 हजार 434     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 618

24 एप्रिल – नवे रुग्ण 1 लाख 05 हजार 616  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 174

25 एप्रिल – नवे रुग्ण 90 हजार 722  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 069

26 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 858  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 751

27 एप्रिल – नवे रुग्ण 69 हजार 206  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 532

अमेरिकेत शनिवारी 2 हजार 065 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. रविवारी हा आकडा घसरून 1 हजार 157 झाला होता. तो थोडा वाढून सोमवारी 1 हजार 384 झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 56 हजार 797 झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही संख्या काल 10 लाख 10 हजार 356 पर्यंत पोहचली. ब्रिटनमध्ये एका दिवसातील मृताचा आकडा आणखी खाली आला आहे. काल दिवसभरात 360 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. स्पेनमध्ये कोरोनाचे 331 बळी गेले आहेत. इटलीत 333, फ्रान्समध्ये 437 तर ब्राझीलमध्ये 272 मृत्यूंची नोंद झाली आहे.

जागतिक क्रमवारीत रशिया नवव्या तर भारत 15 व्या स्थानी

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल रशिया आणि भारताला वरचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रारंभी प्रथम क्रमांकावर असणारा चीन त्या देशाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून आता दहाव्या क्रमांकावर गेला आहे.  दहाव्या क्रमांकावर असलेला रशियाने चीनची नवव्या क्रमांकावरील जागा मिळवली आहे. सुरूवातीच्या काळात 41 व्या क्रमांकावर असणाऱ्या भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढून भारताचा टॉप ट्वेंटी देशांच्या यादीत समावेश झाला. त्यानंतरही एक-एक पायरी वर येत आता भारत कोरोनाबाधित देशांच्या यादीत 15 व्या स्थानी पोहचला आहे.  भारतात 29,451 कोरोनाबाधित असून मृतांची संख्या 928 पर्यंत वाढली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 10,10,356 (+23,196), मृत 56,797 (+1,384)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,29,422 (+2,793), मृत 23,521 (+331)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,99,414 (+1,739), मृत 26,977 (+333)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,65,842 (+3,742), मृत 23,293 (+437)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 158,758 (+988), मृत 6,126 (+150)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 1,57,149 (+4,309), मृत 21,092 (+360)
  7. टर्की – कोरोनाबाधित 112,261 (+2,131), मृत 2,900 (+95)
  8. इराण – कोरोनाबाधित 91,472 (+991), मृत 5,806 (+96)
  9. रशिया – कोरोनाबाधित 87,147 (+6198), मृत 794 (+47)
  10. चीन – कोरोनाबाधित 82,830 (++3), मृत 4,633 (+1)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 66,501 (+3,642), मृत 4,543 (+272)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 48,500 (+1,605), मृत 2,707 (+147)
  13. बेल्जियम – कोरोनाबाधित 46,687 (+553), मृत 7,207 (+113)
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 38,245 (+400), मृत 4,518 (+43)
  15. भारत – कोरोनाबाधित 29,451 (+1,561) , मृत 939 (+58)
  16. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 29,164 (+103), मृत 1,665 (+55)
  17. पेरू –  कोरोनाबाधित 28,699 (+1,182) , मृत 782 (+54)   
  18. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 24,027 (+163), मृत 928 (+25)
  19. इक्वाडोर – कोरोनाबाधित 23,240  (+521), मृत 663 (+87)
  20. आयर्लंडकोरोनाबाधित 19,648 (+386) , मृत 1,102 (+15) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.