World Update: आशादायक! कोरोना संसर्गाचा वेग घटतोय आणि मृत्यूंचे प्रमाणही कमी होतेय?

एमपीसी न्यूज – जगात कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी दोन्हींचा वाढीचा वेग आता मंदावू लागल्याचे दिसून येत आहे, ही बाब आशादायक आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जगभर सुरू असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागल्याचे पहायला मिळत आहे. 

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 लाख 52 हजार 257 वर जाऊन पोहचली असून कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 लाख 14 हजार 194 इतका झाला आहे. आतापर्यंत 4 लाख 23 हजार 554 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  जगात आता कोरोनाचे 13 लाख 15 हजार 354 इतके सक्रिय असून त्यापैकी 12 लाख 64 हजार 597 रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 50 हजार 757 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील चार दिवसांतील जगातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या यावर नजर टाकली तर दोन्हींच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मागील चार दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

9 एप्रिल –  नवे रुग्ण 85 हजार 638 ,  दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 274

10 एप्रिल –  नवे रुग्ण 94 हजार 629,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 973

11 एप्रिल –  नवे रुग्ण 80 हजार 961,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 092

12 एप्रिल –  नवे रुग्ण 72 हजार 523   दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 415

जागतिक क्रमवारीत आता मृतांच्या आकड्यातही अमेरिका प्रथम क्रमांकावर गेला आहे. इंग्लंडने चीनला मागे टाकले आहे. प्रारंभी प्रथम क्रमांकावर असणारा चीन आता सातव्या क्रमांकावर गेला आहे. नेदरलँडने स्वित्झर्लंडला मागे टाकत 11 वे स्थान मिळविले आहे. रशियात नवीन कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे रशियाने ऑस्ट्रीयाला मागे टाकून 16 वे स्थान मिळविले आहे. इस्राईलने दक्षिण कोरियाला मागे टाकत 18 वा क्रमांक मिळविला आहे. भारत मात्र 22 व्या स्थानावर कायम आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 5,60,300 (+27,421), मृत 22,105 (+1,528)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 166,831 (+3,804), मृत 17,209 (+603)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,56,363 (+4,092), मृत 19,899 (+431)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,32,591 (+2,937), मृत 14,393 (+561)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,27,854 (+2,402), मृत 3,022 (+151)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 84,279 (+5,288), मृत 10,612 (+737)
  7. चीन – कोरोनाबाधित  82,052 (+99), मृत 3,339 (+0)
  8. इराण – कोरोनाबाधित 71,686 (+1,657), मृत 4,474 (+117)
  9. टर्की – कोरोनाबाधित 56,956 (+4,789), मृत 1,198 (+97)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 29,647 (+1,629), मृत 3,600 (+254)
  11. नेदरलँड – कोरोनाबाधित 25,587 (+1,174) , मृत 2,737 (+94)
  12. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 25,415 (+308), मृत 1,106 (+70)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 24,383 (+1,065), मृत 717 (+64) 
  14. ब्राझील – कोरोनाबाधित 22,192 (+1,230), मृत 1,223 (+83)
  15. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 16,585 (+598) , मृत 504 (+34)
  16.  रशिया – कोरोनाबाधित 15,770 (+2,186), मृत 130 (+24)
  17. ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 13,945 (+139), मृत 350 (+13)
  18. इस्राईल – कोरोनाबाधित 11,145 (+402) , मृत 103 (+2)
  19. दक्षिण कोरिया – कोरोनाबाधित 10,512 (+32), मृत 214 (+3)
  20.  स्वीडन – कोरोनाबाधित 10,483 (+332) , मृत 899 (+12)
  21. आयर्लंडकोरोनाबाधित 9,655 (+727) , मृत 334 (+14) 
  22. भारत – कोरोनाबाधित 9,205 (+759) , मृत 331 (+43)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.