World Update: दिलासादायक! कोरोनाचे नवे रुग्ण व मृतांचे प्रमाण घटले, सुमारे 6 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

एमपीसी न्यूज – जगभरातील कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याच्या प्रमाणाबरोबरच एका दिवसातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे पाहायला मिळत असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही जवळपास सहा लाखांच्या घरात पोहचली आहे, असे दिलासादायक चित्र आज पाहायला मिळत आहे. चीनने परवा दिवशी कोरोनाबाधित मृतांचा आकडा अचानक 1290 ने अपडेट केल्यामुळे कोरोनाचा जागतिक आलेख काहीसा बिघडल्याचे पहायला मिळत होते. 

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23 लाख 31 हजार 892 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 60 हजार 763 इतकी झाली आहे. आतापर्यंत 5 लाख 97 हजार 194 म्हणजेच जवळपास सहा लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 15 लाख 73 हजार 935 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 15 लाख 18 हजार 670 रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 55 हजार 265 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 966     दिवसभरातील मृतांची संख्या 10 हजार 761

15 एप्रिल – नवे रुग्ण 84 हजार 515     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 959

16 एप्रिल – नवे रुग्ण 95 हजार 22       दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 996

17 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 496       दिवसभरातील मृतांची संख्या 8 हजार 672

17 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 930      दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 505

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत टर्की नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर, रशिया 12 व्या स्थानावरून 11 व्या स्थानावर पोहचला आहे. भारत देखील 18 व्या स्थानावरून आता 17 व्या स्थानावर पोहचला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या सात लाख 38 हजार 792 इतकी झाली आहे. मृतांची संख्या देखील 39 हजारांपेक्षा पुढे गेली आहे. स्पेनने देखील मृतांचा 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 15 हजारच्या पुढे गेला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 7,38,792 (+29,057), मृत 39,014 (+1,867)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 1,94,416 (+3,577), मृत 20,639 (+637)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,75,925 (+3,491), मृत 23,227 (+482)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,51,793 (+3,824), मृत 19,323 (+642)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,43,724 (+2,327), मृत 4,538 (+186)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 1,14,217 (+5,525), मृत 15,464 (+888)
  7. चीन – कोरोनाबाधित 82,719 (+27), मृत 4,632 (+0)
  8. टर्की – कोरोनाबाधित 82,329 (+3783), मृत 1,890 (+121)
  9. इराण – कोरोनाबाधित 80,868 (+1,374), मृत 5,031 (+73)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 37,183 (+1,045), मृत 5,453 (+290)
  11. रशिया – कोरोनाबाधित 36,793 (+4,785), मृत 313 (+40)
  12. ब्राझील – कोरोनाबाधित 36,722 (+3,040), मृत 2,361 (+220)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 33,383 (+1,456), मृत 1,470 (+160) 
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 31,589 (+1,140) , मृत 3,601 (+142)
  15. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 27,404 (+326), मृत 1,368 (+41)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 19,685 (+663), मृत 687 (+30)
  17.  भारत – कोरोनाबाधित 16,365 (+2,013) , मृत 521 (+35)
  18. आयर्लंडकोरोनाबाधित 14,758 (+778) , मृत 571 (+41)
  19. ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,671 (+76), मृत 443 (+12)
  20. पेरू –  कोरोनाबाधित 14,420 (+931) , मृत 348 (+48)                       

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.