World Update: कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 37 हजार, मृतांचा आकडा 1 लाख 84 हजार तर कोरोनामुक्तांची संख्या 7 लाखांवर

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26 लाख 37 हजार 681 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 84 हजार 219 (6.98 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 17 हजार 759 (27.21 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 17 लाख 35 हजार 703 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 16 लाख 79 हजार 029 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 56 हजार 674 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. 

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

17 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 497      दिवसभरातील मृतांची संख्या 8 हजार 326

18 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 906     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 433

19 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 804     दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 984

_MPC_DIR_MPU_II

20 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 931     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 366

21 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 254     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 062

22 एप्रिल – नवे रुग्ण 79 हजार 959     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 607

अमेरिकेत काल 2 हजार 341 कोरोनाबाधितांचा काल मृत्यू झाला. अमेरिकेत मंगळवारी 2804 इतक्या विक्रमी मृत्यूंची नोंद झाली होती. ते प्रमाण काल काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत एकूण 8 लाख 48 हजार 717 कोरोनाबाधित असून त्यापैकी 47 हजार 659 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीने काल मृतांचा 25 हजारांचा टप्पा ओलांडला तर जर्मनीने कोरोनाबाधितांचा दीड लाखांचा टप्पा पूर्ण केला. इंग्लंडमधील मृतांचा आकडा आता 18 हजारांपेक्षा अधिक झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 8,48,717 (+29,973), मृत 47,659 (+2,341)
 2. स्पेन – कोरोनाबाधित 2,08,389 (+4,211), मृत 21,717 (+435)
 3. इटली – कोरोनाबाधित 1,87,327 (+3,370), मृत 25,085 (+437)
 4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,59,877 (+1,827), मृत 21,340 (+544)
 5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,50,648 (+2,195), मृत 5,315 (+229)
 6. यू. के. – कोरोनाबाधित 1,33,495 (+4,451), मृत 18,100 (+763)
 7. टर्की – कोरोनाबाधित 98,674 (+3,083), मृत 2,376 (+117)
 8. इराण – कोरोनाबाधित 85,996 (+1,194), मृत 5,391 (+94)
 9. चीन – कोरोनाबाधित 82,788 (+30), मृत 4,632 (+0)
 10. रशिया – कोरोनाबाधित 57,999 (+5236), मृत 513 (+57)
 11. ब्राझील – कोरोनाबाधित 45,757 (+2,678), मृत 2,906 (+165)
 12. बेल्जियम – कोरोनाबाधित 41,889 (+933), मृत 6,262 (+264)
 13. कॅनडा – कोरोनाबाधित 40,190 (+1,768), मृत 1,974 (+140) 
 14. नेदरलँड – कोरोनाबाधित 34,842 (+708) , मृत 4,054 (+138)
 15. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 28,268 (+205), मृत 1,509 (+31)
 16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 21,982 (+603), मृत 785 (+23)
 17.  भारत – कोरोनाबाधित 21,370 (+1,290) , मृत 681 (+36)
 18. पेरू –  कोरोनाबाधित 19,250 (+1,413) , मृत 530 (+46)   
 19. आयर्लंडकोरोनाबाधित 16,671 (+631) , मृत 769 (+39)
 20. स्वीडन – कोरोनाबाधित 16,004 (+682), मृत 1,937 (+172)       

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1