World Update: चिंताजनक! जगात पाच दिवसांनंतर कोरोनाच्या आलेखाने घेतली उसळी

जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाखांच्या उंबरठ्यावर, मृतांनी ओलांडला सव्वालाखांचा आकडा

एमपीसी न्यूज – जगात कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेले पाच दिवस मंदावत असलेला नवीन रुग्ण वाढीचा वेग तसेच नवीन मृत्यूंचा वेग काल अचानक वाढल्याचे पहायला मिळत आहे, ही बाब चिंताजनक आहे. जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली असून कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने सव्वालाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19 लाख 98 हजार 111 इतकी झाली आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या 1 लाख 26 हजार 604 वर जाऊन धडकली आहे. आतापर्यंत 4 लाख 78 हजार 659 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  जगात आता कोरोनाचे 13 लाख 92 हजार 848 इतके सक्रिय असून त्यापैकी 13 लाख 41 हजार 240 रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 51 हजार 608 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील पाच दिवसांतील जगातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या यावर नजर टाकली तर दोन्हींच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. त्यात काल अचानक वाढ झाल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

9 एप्रिल –  नवे रुग्ण 85 हजार 638 ,  दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 274

10 एप्रिल –  नवे रुग्ण 94 हजार 629,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 973

11 एप्रिल –  नवे रुग्ण 80 हजार 961,   दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 092

12 एप्रिल –  नवे रुग्ण 72 हजार 523   दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 415

13 एप्रिल – नवे रुग्ण 71 हजार 591     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 423

14 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 969    दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 982

अमेरिकेत 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 33,752 (मृत 2,035) होती, ती 13 एप्रिलला 26,641 (मृत 1,535) आहे. ती वाढून 14 एप्रिलला 26,945 (मृत 2407) झाली आहे. ब्रिटनमध्ये 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 8,681 (मृत 980) होती, ती 13 एप्रिलला 4,342 (मृत 717) होती. ती वाढून 14 एप्रिल 5,252 (मृत 778) इतकी झाली आहे. स्पेनमध्ये 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 5,051 (मृत 634) होती, ती 13 एप्रिलला 3,268 (मृत 547) होती. ती वाढून 14 एप्रिलला 3,961 झाली आहे. मृतांचा आकडा मात्र थोडा घटून 499 झाला आहे. इटलीमध्ये 10 एप्रिलला एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या 3,951 (मृत 570) होती, ती 13 एप्रिलला 3,153 (मृत 566) झाली होती. त्यापैकी रुग्णांच्या संख्येत आणखी घट होऊन 14 एप्रिलला 2,972 झाली आहे. मात्र मृतांचा आकडा 602 इतका वाढल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 6,13,886 (+26,945), मृत 26,047 (+2,407)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 174,060 (+3,961), मृत 18,255 (+499)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,62,488 (+2,972), मृत 21,067 (+602)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,43,303 (+6,524), मृत 15,729 (+762)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,32,210 (+2,138), मृत 3,495 (+301)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 93,873 (+5,252), मृत 12,107 (+778)
  7. चीन – कोरोनाबाधित  82,249 (+89), मृत 3,341 (+0)
  8. इराण – कोरोनाबाधित 74,877 (+1,574), मृत 4,683 (+98)
  9. टर्की – कोरोनाबाधित 65,111 (+4,062), मृत 1,403 (+107)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 31,119 (+530), मृत 4,157 (+254)
  11. नेदरलँड – कोरोनाबाधित 27,419 (+868) , मृत 2,945 (+122)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 27,063 (+1,383), मृत 903 (+123) 
  13. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 25,936 (+248), मृत 1,174 (+36)
  14. ब्राझील – कोरोनाबाधित 21,102 (+2,774), मृत 1,532 (+204)
  15. रशिया – कोरोनाबाधित 21,102 (+2,774), मृत 170 (+22)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 17,448 (+514), मृत 567 (+32)
  17.  ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,226 (+185), मृत 384 (+16)
  18. इस्राईल – कोरोनाबाधित 12,046 (+460) , मृत 123 (+7)
  19. भारत – कोरोनाबाधित 11,487 (+1,034) , मृत 393 (+35)
  20. आयर्लंडकोरोनाबाधित 11,479 (+832) , मृत 406 (+41) 
  21. स्वीडन – कोरोनाबाधित 11,445 (+497) , मृत 1,033 (+114)
  22. दक्षिण कोरिया – कोरोनाबाधित 10,564 (+27), मृत 222 (+5)
  23. पेरू – कोरोनाबाधित 10,303 (+519), मृत 230 (+14)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.