Talegaon News : फ्रेंड्स ऑफ नेचर व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने विश्व आर्द्रभूमी दिवस उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : – 2 फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी  “World Wetland Day” म्हणून जगभर साजरा केला जातो.याचे औचित्य साधून  “फ्रेंड्स ऑफ नेचर” व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारी तळेगाव स्टेशन विभागातील  तळ्याच्या काठावर वृक्षारोपण (Talegaon News)करण्यात आले.

पाणवठ्या साठी पोषक व तेथील जलचर, पाणपक्षी व इतर पाणवठ्याशी सलग्न जीवसृष्टी यांना ऊपयुक्त अशा  शमी, बेल, खैर, बाभुळ, अशी 70 रोपांचे पहिल्या टप्प्यात रोपण करण्यात आले.या तळ्यावर पूर्वी युरोपवरून तलवार बदके हजारोंच्या संखेने येत असत व इतरही अनेक पाणपक्षी मोठ्या संख्येत दिसायचे. डॉ.सलीम अली येथे नेहमी पक्षी निरीक्षणासाठी येत असत.

Bhosari Crime News : दररोज एक टक्का नफ्याचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक

एप्रिल 2023 मधे “फ्रेंड्स ऑफ नेचर” चे रौप्यमोहोत्सवी वर्ष सुरू होत आहे या निमित्ताने या तळ्याला पुर्वीचे पक्षीवैभव प्राप्त करून देण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचा निर्धार संस्थेने केला आहे.

पाण्याची गुणवत्ता सुधारावी या साठी येथे 50 फूट कारंजे लोकसहभागातून उभारण्याच्या तदानपा च्या प्रस्तावास फ्रेंड्स ऑफ नेचर ने भरीव अर्थसहाय्य केले आहे. कारंजासाठी कॉन्ट्रॅक्टर व तळेगाव दाभाडे नगर परिषदचे कर्मचारी यांचे ही अर्थसहाय्य मिळाले आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषद चे मुख्याधिकारी मा.विजयकुमार सरनाईक यानी फ्रेंड्स ऑफ नेचर ने या कामी पुढाकार घेतल्याबद्दल आभार मानले.  संस्थापक महेश महाजन यानी या ठिकाणी भविष्यात भेळपुरी गाडे, चौपाटी,  होऊ न देता संपूर्ण नैसर्गिक परीसरच ठेवावा अशी तळेगाव दाभाडे नगर परिषदेला विनंती केली.

अध्यक्ष निरज शाही यानी प्रास्ताविक केले, सचिव निशिकांत पंचवाघ यानी आभार मानले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे  वृक्ष अधिकारी सिद्धेश्वर महाजनरणजीत सुर्यवंशी तसेच संस्थेचे सुधाकर मोरेदिपक शिरसाठविश्वास देशपांडेवसंत भेगडेडॉ.अनंत परांजपे, पूजा डोळस व सर्व सदस्य यांनी वृक्षारोपणात भरीव योगदान दिले.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share