International Yoga Day : योगासनांचे प्रात्यक्षिक आणि महत्व जाणून घेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योगदिन साजरा

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योगदिन (International Yoga Day) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योगासने केली. तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे फायदे सांगून योगासने दररोज करण्याचे महत्व विशद केले.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोपी शेट्टी तसेच शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्विनी सरोदे, प्राथमिक विभाग प्रमुख धनश्री पाटील, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोपी शेट्टी यांचा सत्कार शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Governor Koshyari Covid Positive : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना

 

 

इयत्ता 3री व 4थी तील विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. इ 9 वीतील हिमेश हरिणखेडे, 8 वी तील वेदांत देशमुख, पूर्वा बवले या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून योग दिनाचे महत्त्व सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोपी शेट्टी यांनी “योग ही प्राचीन काळापासून आलेली परंपरा तसेच आत्मा व परमात्मा यांचे एकत्रीकरण म्हणजे योग होय” अशी योगाची परिभाषा सांगून योगामुळे शरीर व मन निरोगी राहते.योगसाधनेने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. याचबरोबर  शालेय जीवनातील व्यायाम तसेच मैदानी खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर शालेय शिक्षिका  सुजाता गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना योग साधणे बरोबरच ध्यान साधनेचे महत्त्व पटवून सांगितले.

 

 

 

 

विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, त्रिकोणासन, प्राणायाम, वृक्षासन, ताडासन, भ्रामरी, वज्रासन, सर्वांगासन,भुजंगासन,मकरासन  इ. आरोग्यदायी उंची वाढविण्यासाठी उपयोगी असे विविध आसनांचे  प्रात्यक्षिक शेट्टी सरांनी करून दाखवले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे व आनंदाने योगासने केली.

 

योगदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॕडम,पर्यवेक्षिका मा.सौ. रेणू शर्मा मॕडम ,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सोनिका कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रियांका पवार यांनी केले.

 

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे मॅडम,संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उ-र्हे, सचिव मिलिंद शेलार सर, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, यांनी विद्यार्थ्यांनी योगासने करून आपले शरीर आरोग्यदायी ठेवावे असा संदेश दिला.

 

‘ॐ भूर्भुवः स्वः’या गायत्री मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.