World’s Richest Person : एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अ‍ॅमेझॉनचे जेफ बोजेस यांना टाकले मागे

एमपीसी न्यूज – टेसला आणि स्पेस एक्स या कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अ‍ॅमेझॉनचे जेफ बोजेस यांना मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. टेसला कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांचा निर्देशांक यांनी जगातील 500 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. ब्लूमबर्गच्या या यादीनुसार एलॉन मस्क यांची संपत्ती 195 अब्ज अमेरीकी डॉलर एवढी आहे. जेफ बोजेस यांची 185 अब्ज अमेरीकी डॉलर तर, तिसऱ्या स्थानावर असलेल्या बिल गेटस् यांची एकूण संपत्ती 134 अब्ज अमेरीकी डॉलर आहे. फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग हे 102 अब्ज अमेरीकी डॉलर एवढ्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

रिलायंस इंडियाचे मालक मुकेश अंबानी यांची 73.4 अब्ज अमेरीकी डॉलर एवढी संपत्ती असून ते या यादीत तेराव्या स्थानावर आहेत. अझीम प्रेमजी हे 55 व्या स्थानावर आहेत व त्यांची संपत्ती 26.2 अब्ज अमेरीकी डॉलर एवढी आहे.

टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये गुरुवारी 4.8 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत 500 लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले. गेल्या काही वर्षांत एलन मस्क यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत 150 अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.