India Corona Update : चिंताजनक ! गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या कोरोना रुग्णांची नोंद  

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 630 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रात 55 हजार 469 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 28 लाख 01 हजार 785 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 17 लाख 92 हजार 135 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 59 हजार 856 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 92.11 टक्के एवढा झाला आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची 8 लाख 43 हजार 473 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 630 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 66 हजार 177 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.29 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 25 कोटी 14 लाख 39 हजार 598 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 12 लाख 08 हजार 329 चाचण्या मंगळवारी (दि.06) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.