India Corona Update : चिंताजनक ! 24 तासांत केरळमध्ये 30 हजार रुग्णांची नोंद, देशात 44,658 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असले तरी केरळ राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा हातपाय पसरायला लागला आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 30 हजार 7 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, देशात 44 हजार 658 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत वाढ झाली असून, एकट्या केरळमध्ये देशातील सक्रिय रुग्णांच्या 52 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 26 लाख 03 हजार 188 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 18 लाख 21 हजार 428 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 32 हजार 988 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला देशात 3 लाख 44 हजार 899 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी केरळमध्ये 1 लक्ष 81 हजार 747 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, महाराष्ट्रात 53 हजार 908 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांत देशभरात 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 36 हजार 861 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.65 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 51 कोटी 49 लाख 54 हजार 309 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 24 हजार 931 नमूने  तपासण्यात आले आहेत.

देशातील 50 टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस 

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात 50 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. आत्तापर्यंत देशात 61 कोटी 22 लाख 08 हजार 542 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत 79 लाख 48 हजार 439 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.