Corona Mutation In Maharashtra : चिंताजनक ! महाराष्ट्रात ‘कोरोना म्युटेशन’चे अनेक रूग्ण

चाचणीची संख्या वाढवण्याची गरज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात कोरोना म्युटेशनचे रूग्ण आढळून आले आहेत. हे म्युटेशन ब्रिटनच्या नव्या स्ट्रेन पेक्षा वेगळं आहे. डॉ. तात्याराव लहाणे  यांनी एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना हि माहिती दिली.

एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. तात्याराव लहाणे म्हणाले, महाराष्ट्रात ‘कोरोना म्युटेशन’चे रूग्ण आढळून आले आहेत. पण, या म्युटेशन बाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. या संसर्गाचा वेग किती, तो कशाप्रकारे पसरतो हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. तूर्तास याला कोरोना विषाणू वेगळा स्ट्रेन देखील म्हणाता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्युटेशन बाबत अधिक सविस्तर अभ्यास होणं गरजेचं आहे. वैज्ञानिक यासाठी अधिक जीन सिक्वेन्सिंग करत आहेत ज्याची माहिती पुढच्या 10 ते 15 दिवसात समोर येईल.

डॉ. लहाणे पुढे म्हणाले, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यात सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली. त्यात अमरावतीत तीन, अकोल्यात तीन आणि यवतमाळ मध्ये दोन म्युटेशनचे नमूने आढळले असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी (दि.16) हे नमूने आढल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सर्वच ठिकाणी नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांमध्ये बेफिकीरी वाढली असून रूग्णांची संख्या देखील वाढत आहे.

सिक्वेन्सिंग साठी 8 ते दहा दिवस लागतात. आणि याच्या स्पाईक प्रोटिन सिक्वेन्स मध्ये बदल असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. नवा युके स्ट्रेन सोबत याचं साधर्म होत असलं तरी हा युके स्ट्रेन नसल्याचे त्यांनी नमूद केले. या तीन जिल्ह्यात सापडलेले म्युटेशन वेगळी आहेत. याबाबत अधिक तपशील गोळा करण्यासाठी अधिक सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे असे लहाणे म्हणाले.

दगम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज नोंद होणा-या रूग्णांची संख्या वाढली आहे. गुरूवारी तर, मागील चार तो पाच महिन्यातील उच्चांकी पाच हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यात रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.