World Update: चिंताजनक! दोन दिवसांनंतर कोरोना बळींच्या संख्येत वाढ, अमेरिकेत एका दिवसात 2,470 बळी

कोरोनावर मात करणाऱ्यांची वाढती टक्केवारी दिलासादायक

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांत खाली आलेली कोरोनाबाधितांची संख्या व मृतांच्या संख्या काल (मंगळवारी) एकदम उसळी मारून वर गेल्याने चिंतेत भर पडली आहे. मृत्यूदर किंचित वाढला असला तरी कोरोनावर मात करणाऱ्यांच्या टक्केवारीतील वाढ सुरूच राहिली आहे, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे.

जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येने काल (बुधवारी) 30 लाखांचा  टप्पा पार केला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 31 लाख 36 हजार 508 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 17 हजार 813 (6.94 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 9 लाख 53 हजार 309 (30.39 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 19 लाख 65 हजार 386 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 19,07,410 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 56,965 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

24 एप्रिल – नवे रुग्ण 1 लाख 05 हजार 616  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 174

25 एप्रिल – नवे रुग्ण 90 हजार 722  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 069

26 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 858  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 751

_MPC_DIR_MPU_II

27 एप्रिल – नवे रुग्ण 69 हजार 206  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 532

28 एप्रिल – नवे रुग्ण 76 हजार 562  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 365

अमेरिकेत रविवारी कोरोनाबाधित मृतांचा आकडा घसरून 1 हजार 157 झाला होता. तो थोडा वाढून सोमवारी 1 हजार 384 झाला. त्यात काल (मंगळवारी) एकदम 1,086 ने वाढ झाली. अमेरिकेत मंगळवारी एका दिवसांत 2,470 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 59 हजार 266 झाला आहे. ब्रिटनमध्ये काल दिवसभरात 586 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ब्राझीलमध्ये 520 मृत्यूंची नोंद झाली आहे स्पेनमध्ये कोरोनाचे 301, इटलीत 382, तर फ्रान्समध्ये 367 बळी गेले आहेत. इटलीने कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा दोन लाखांचा तर कॅनडाने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

जागतिक क्रमवारीत इंग्लंड पाचव्या तर रशिया आठव्या स्थानी

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल इंग्लंड, रशिया, पेरूने वरचे स्थान प्राप्त झाले आहे. तर सौदी अरेबियाचा टॉप ट्वेंटी देशांच्या यादीत प्रवेश झाला आहे. तर आर्यलंड 21 व्या स्थानावर गेला आहे. इंग्लंडमध्ये जर्मनीपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या जास्त झाल्याने इंग्लंडला पाचवे स्थान मिळाले. दहाव्या क्रमांकावर असलेला रशियाने परवा चीनची नवव्या क्रमांकावरील जागा मिळवली होती. काल इराणलाही मागे टाकत रशियाने आठव्या स्थानावर गेला आहे. पेरु देश 17 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर पोहचला आहे. आयर्लंडला मागे टाकर सौदी अरेबियाने 20 वे स्थान मिळविले आहे. भारत कोरोनाबाधित देशांच्या यादीत 15 व्या स्थानी कायम आहे.  भारताने कोरोनाबाधितांचा रुग्णांचा 30 हजारचा तर मृतांचा एक हजारचा टप्पा ओलांडला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 10,35,765 (+25,409), मृत 59,266 (+2,470)
 2. स्पेन – कोरोनाबाधित 2,32,128 (+2,706), मृत 23,822 (+301)
 3. इटली – कोरोनाबाधित 2,01,505 (+2,091), मृत 27,359 (+382)
 4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,65,911 (+2,638), मृत 23,660 (+367)
 5. यू. के. – कोरोनाबाधित 1,61,145 (+3,996), मृत 21,678 (+586)
 6. जर्मनी – कोरोनाबाधित 1.59,912 (+1,154), मृत 6,314 (+188)
 7. टर्की – कोरोनाबाधित 1,14,653 (+2,392), मृत 2,992 (+92)
 8. रशिया – कोरोनाबाधित 93,558 (+6,411), मृत 867 (+73)
 9. इराण – कोरोनाबाधित 92,584 (+1,112), मृत 5,877 (+71)
 10. चीन – कोरोनाबाधित 82,836 (+6), मृत 4,633 (+0)
 11. ब्राझील – कोरोनाबाधित 72,899 (+6,398), मृत 5,063 (+520)
 12. कॅनडा – कोरोनाबाधित 50,026 (+1,526), मृत 2,859 (+152)
 13. बेल्जियम – कोरोनाबाधित 47,334 (+647), मृत 7,331 (+124)
 14. नेदरलँड – कोरोनाबाधित 38,416 (+171), मृत 4,566 (+48)
 15. भारत – कोरोनाबाधित 31,324 (+1,873) , मृत 1,008 (+69)
 16. पेरू –  कोरोनाबाधित 31,190 (+2,491) , मृत 854 (+72) 
 17. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 29,264 (+100), मृत 1,699 (+34)
 18. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 24,322 (+295), मृत 948 (+20)
 19. इक्वाडोर – कोरोनाबाधित 24,258  (+1,018), मृत 871 (+208)
 20. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 20,077 (+1,266) , मृत 152 (+8) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.