Pune: श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन, आरती करून नागरिकांना पेढे वाटप

Worship of Shri Rama's idol and distribution of sweets to citizens on the occassion Ram Mandir Bhumipujan in Ayodhya.

एमपीसी न्यूज – वारजे – माळवाडी परिसरात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन, आरती करून बुधवारी नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कॅनेरियन इंटरनॅशनल इंक, कॅनडा अध्यक्ष अरविंद जोशी, प्रकाश आळंदकर, अभिजीत धावडे, पै. दत्तात्रय दांगट, ऊद्योजक हनुमंत नवले, जितेंद्र परिहार, सागर मापारा, उमेद जांगेड, अमर ढमाले, प्रज्ञा लोणकर, रेणुका मोरे, वर्षा पवार, सुप्रिया निंबाळकर, हनुमंत कांबळे,  संतोष खटावकर, जगदीश चौधरी, बाबूलाल देवाशी, अब्दुलसमद अन्सारी, अमजद अन्सारी यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट यांनी केले होते. परमवैभव प्राप्त असलेल्या हिंदुस्तानातील प्रत्येक हिंदुच्या आस्थेचा विषय असलेल्या प्रभु श्रीरामाचे अयोध्यानगरीतील मंदीराचे भुमिपुजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शुभहस्ते झाले.

देशातील अनेक पुजनीय, वंदनीय महानुभावांचे उपस्थितीत शुभमुहुर्तावर करण्यात आले.

संपूर्ण हिंदुस्तानातील श्रीरामभक्त हा एैतिहासिक क्षण आपल्या भक्तीभावाने एक उत्सव म्हणुन साजरा करीत आहेत. भारतीय जनता पक्ष, पुणे शहराच्या वतीने संपूर्ण शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.