WPL 2023 – गुजरात जायंट्सने केली दिल्ली कॅपिटल्सवर मात

एमपीसी न्यूज – गुजरातच्या कमी पडलेल्या फलंदाजीमुळे (WPL 2023) दिल्ली कॅपिटल्सने काल गुरुवारी स्वतःचा वुमेन्स प्रीमियर लीगचा दूसरा सामना जिंकला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरातने दिल्लीला 11 धावांनी हरवले. दिल्ली कॅपिटलच्या पराभवामुळे त्यांचे क्वालिफायर्सला पात्र ठरणे निश्चित होण्यात विलंब झाला.

147 धावांचा बचाव करताना, गुजरातने उत्तम गोलंदाजी कामगिरी करून दिल्लीच्या फलंदाजीला अंतिम षटकात 136 धावांत गुंडाळले. अ‍ॅशले गार्डनरने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरातने विजय मिळवला. तिने 33 चेंडूत नाबाद 51 धावा ठोकल्या आणि 3.4 षटकात 19 धावा देऊन दोन गडी बाद केले.

Chinchwad : कुख्यात गुंड बाळा वाघेरेला राहत्या घरातून अटक

या विजयामुळे जायंट्स प्ले-ऑफमध्ये स्थान अजूनही मिळवू शकतात. अवघड धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची फलंदाजी खचली कारण 7 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. गुरुवारी रात्री येथे होणारा सामना WPL च्या उद्घाटन (WPL 2023) आवृत्तीतील कॅपिटल्स आणि जायंट्स यांच्यातील दुसरा होता.

त्यांच्या याआधीच्या लढतीत, दिल्लीने 8 षटकांत 100 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना 10 गडी राखून मोठा विजय नोंदवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.