WPL 2023 : मुंबई इंडियन्सने जिंकले पहिले महिला प्रीमियर लीग 2023

एमपीसी न्यूज – काल ( दि. 26 मार्च) रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न (WPL 2023)  स्टेडियमवर झालेल्या महिला प्रीमियर लीग 2023 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 132 धावांचे लक्ष्य ठेवले. 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 19.3 षटकातच लक्ष्य पूर्ण केले.

दिल्ली कडून मेग लॅनिंग हिने सर्वाधिक 29 चेंदुंमध्ये 35 धावा बनवल्या. शिखा पांडे आणि राधा यादव या दोघींनी ही ताबडतोप 27 धावा काढल्या. बाकीच्या फलंदाजांनी हार स्वीकारली असे म्हणू शकतो. एमआयची नॅट सायव्हर-ब्रंटने उत्कृष्ट खेळी करत 55 चेंडूत 60 धावा केल्या व ती नाबाद राहिली, तर संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 39 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले.

 

Pune News : बंदिश म्हणजे आरंभ आणि निरंतरता : पंडित सत्यशील देशपांडे

 

एमआय महिला संघाच्या विजयामुळे पुरुष संघाने जिंकलेल्या दोन चॅम्पियन्स लीग ट्रॉफींबरोबरच त्यांच्या 5 इंडियन प्रीमियर लीग (IPL) ट्रॉफीच्या संख्येत भर पडली आहे.

संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, दिल्ली कॅपिटलसच्या मेग लॅनिंगला सर्वाधिक धावांसाठी ऑरेंज कॅप हा मुकुट देण्यात आला तर मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हेली मॅथ्यूजला सर्वाधिक विकेट्स साठी पर्पल (WPL 2023) कॅप देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.