Dehuroad : दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने घेतले. पॉलिश करण्यासाठी घेतलेले दागिने घेऊन दोन ठग पसार झाले. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास मामुर्डी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुभद्रा मारुती राऊत (वय 45, रा. मामुर्डी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन इसम सुभद्रा यांच्या घरी आले. त्यांनी दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सुभद्रा यांचा विश्वास संपादन करून 42 हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन पैंजण घेतले. पॉलिश करता-करता दोन्ही ठगांनी पोबारा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.