Pune News : पैलवान मंगलदास बांदल अखेर अटकेत

एमपीसी न्यूज : पैलवान मंगलदास बांदल यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. खोटे खरेदी खत तयार करून त्याआधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून आठ लाख रुपये कर्ज बांदल यांनी घेतले होते. हे पैसे मंगलदास बांदल यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

तसेच पुन्हा याच मिळकतीवर कुलमुखत्यार पत्र व बनावट दस्तऐवज तयार करून शिवाजीराव भोसले बँकेकडून एक कोटी 25 लाख रुपये कर्ज घेतले होते. हे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बँकेचे हप्ते न भरता दोन कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली.

काही दिवसांपूर्वीच मंगलदास बांदल यांच्यावर आणि त्यांच्या भावावर सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी आज मंगलदास बांदल यांना या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.