Chinchwad News : कवी नीलेश म्हसाये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साहित्यिकांनी केले वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – लेखक, कवी, सूत्रसंवादक, प्रकाशक, युवा चैतन्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कै. नीलेश म्हसाये यांच्या आठवणी साहित्यिकांनी जागवल्या. नीलेश म्हसाये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या हस्ते एक झाड लावण्यात आले. झाड लावताना गझलकार रघुनाथ पाटील यांनी लिहिलेली भावपूर्ण कविता कवी दत्तू ठोकळे यांनी गायली. 

साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या  वतीने  चिंचवडगाव येथील मोरया गोसावी क्रीडांगण परिसर केशवनगर येथे साहित्यिकांनी कवी नीलेश म्हसाये यांच्या आठवणी जागवल्या.

या शोकसभेला साहित्य संवर्धन समितीच्या कार्याध्यक्ष शोभा शरद जोशी, समरसता साहित्य परिषदेचे सचिव सुहास घुमरे, तानाजी एकोंडे, शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कैलास भैरट, पत्रकार, कवी पितांबर लोहार, आय के शेख, संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, बाळासाहेब सुबंध, कॅप्टन सुनील डोबाळे, शामराव सरकाळे, निशिकांत गुमास्ते, मुरलीधर दळवी, शरद काणेकर, फुलवती जगताप, नीलेश शेंबेकर,रामचंद्र प्रधान,अंजु सोनवणे उपस्थित होते.

दिलासा संस्था आणि साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष  सुरेश कंक यांनी कै. नीलेश म्हसाये यांच्या आठवणी आपल्या कवितेतून  जागविल्या. आठवणींचा जागर करताना नीलेश म्हसाये यांच्या प्रत्येक आठवणीने कवींच्या डोळ्यातील आसवे वाहात होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.